समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:16 AM2018-04-04T00:16:49+5:302018-04-04T00:16:49+5:30

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Malegaon: The sad memories of the demise of Bhai Vaidya | समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

googlenewsNext
ठळक मुद्देभाई वैद्य मालेगावी येवून मार्गदर्शन करीत असतसामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव करुन देत

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मालेगाव हे समाजवादी चळवळीचे एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे भाई वैद्य यांचे मालेगावात नेहमीच विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी येणे असायचे. परखड, स्पष्ट वक्ता असल्याने भार्इंना ऐकण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने जमत. राष्टÑसेवा दलाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम असो की, मुस्लिम युवकांचे शिबीरासाठी भाई वैद्य मालेगावी येवून मार्गदर्शन करीत असत. राष्टÑसेवा दलाची अमृत महोत्सवी कार्यक्रमांच्या बैठकीसाठी ते मालेगावी आले होते. ८७ वर्ष वयाची पर्वा न करता २०१६ मध्ये ते संपूर्ण महाराष्टÑ भर फिरून अमृत महोत्सवी कार्यक्रमांची तयारीत ते व्यक्त होते. येथील या. ना. जाधव विद्यालयात १९ र्मा २०१६ रोजी त्यांची मालेगावी शेवटची भेट संस्मरणीय ठरली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव करुन देत राष्टÑसेवा दलाची देशाला सद्यस्थितीत गरज असल्याचे सांगितले होते. मालेगावचे तत्कालीन लोकप्रतिनिधी निहाल अहमद यांचे समवेत ते महाराष्टÑ राज्याच्या मंत्रीमंडळात १९८० चे सुमारास एकत्रितपणे काम केले होते. निहालभाई रोजगार हमी मंत्री होते तर भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते. जनता पक्ष, समाजवादी पक्ष, राष्टÑसेवा दलाच्या कार्यक्रमांसाठी ते अनेकवेळा मालेगावी येवून मार्गदर्शन करून गेल्याची राष्टÑसेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी दिली. गुरूवर्य बोवादादा यांच्या जीवनावरील ‘ज्ञानतपस्वी’ विशेषांकाचे प्रकाशन भाई वैद्य यांचे हस्ते मालेगावी झाले होते. यावेळी डॉ. बळीराम हिरे, स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर, निवृत्ती कामगार आयुक्त के. डी. खरे, प्रा. रमाकांत वालवडकर, प्रा. सुभाष खरे, प्रसाद हिरे यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाल्याचे श्रीकांत वाघ यांनी सांगितले. भार्इंचे जसे मालेगावशी सामाजिक व राजकीय संबंध होते तसे त्यांचे कौटुंबिक संबंधही दृढ होते. त्यांची एकुलती एक कन्या डॉ. प्राची हिचा शुभविवाह मुळचे मालेगावचे आझाद चौकातील रहिवाशी व सध्या पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. प्रताप मनोहर रावळ यांचेशी झाला आहे. त्यामुळे त्यांचे मालेगावशी कायमचे नाते जुळले होते. मालेगावातील डॉ. सुगन बरंठ, दत्ता वडगे, अ‍ॅड. भास्कर तिवारी, संजय जोशी, कै. डॉ. नवलराय शहा, निहाल अहमद यांचेशी भार्इंचे नेहमीच संबंध राहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी कार्यक्रमासाठी मालेगावी येण्यासाठी त्यांना आपण खास निमंत्रण देण्यासाठी गेल्याची आठवण दत्ता वडगे यांनी सांगितली.

Web Title: Malegaon: The sad memories of the demise of Bhai Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.