यंदाच्या उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी मातीचे जार, मग, ग्लास बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:55 PM2018-03-01T16:55:47+5:302018-03-01T16:55:47+5:30

विविध आकार, प्रकारातील माठ, रांजणांना मागणी

 To make thirst for this summer, soil jars, then, enter the glass market | यंदाच्या उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी मातीचे जार, मग, ग्लास बाजारात दाखल

यंदाच्या उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी मातीचे जार, मग, ग्लास बाजारात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे विविध आकार, प्रकारातील माठ, रांजणांना मागणी

नाशिक : उन्हाळयाची चाहूल लागताच नागरिकांनी थंडगार पाण्यासाठी लाल व काळया मातीचे माठ खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकाराचे नक्षीदार माठ ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत.यंदा विशेष म्हणजे माती पासून पाण्याची बाटली, मातीचे ग्लास व मातीचे जार (मग) विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. मातीचा ग्लास १५ रूपये, पाणी बाटली १२० रूपये तर मातीचा जार (मग) १५० रूपये दराने विक्र ी होत आहे.
यंदा माठाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. उन्हाळा म्हटला की, मातीच्या माठातील थंडगार पाणी असे समीकरण बनले आहे. आरोग्यासाठी ते सर्वोत्तम असल्याचेही बोलले जाते. गरिबा घरचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाºया मातीच्या लाल, काळया रंगाच्या मोठया रांजण व माठाला मागणी असते. यंदाही बाजारात विविध नक्षीदार माठ विक्र ीसाठी दाखल झाले आहेत. पांढºया रंगाच्या नक्षीदार माठ खरेदीसाठी ग्राहकांना २५० ते ४५० रूपये मोजावे लागत आहेत तर लाल व काळया मातीच्या माठाची किंमत १२० ते २०० रूपये आहे.
उन्हाळयाची चाहूल लागल्याने नागरिकांनी माठ खरेदीला सुरु वात केली आहे. यंदा मातीपासून तयार केलेली पाण्याची बाटली, मातीचे ग्लास व मातीचे जार ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.

Web Title:  To make thirst for this summer, soil jars, then, enter the glass market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.