लोकसभा निवडणूक जिंकू : आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:16 AM2018-10-10T01:16:08+5:302018-10-10T01:17:21+5:30

लासलगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हीच बाजी मारून विरोधकांना धोबीपछाड देऊ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दुपारी लासलगाव येथे व्यक्त केला.

Lok Sabha election win: Athawale | लोकसभा निवडणूक जिंकू : आठवले

लोकसभा निवडणूक जिंकू : आठवले

Next
ठळक मुद्देमहावीर विद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे तर डिजिटल रूमचे उद्घाटन

लासलगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हीच बाजी मारून विरोधकांना धोबीपछाड देऊ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दुपारी लासलगाव येथे व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते महावीर विद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे तर डिजिटल रूमचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व भाजपा नेते सुरेशबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार किशोर दराडे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
लासलगावशी असलेल्या ॠणानुबंधाचा विचार करूनच श्री महावीर विद्यालयाला १५ लाख रुपयांचा निधी दिला असे आठवले यांनी यावेळी सांगितले. छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करीत राज्य शासनावर टीका केली. सभामंडपाकरिता पंधरा लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून देण्याची घोषणा यावेळी भुजबळ यांनी केली. आमदार किशोर दराडे यांनी सायन्स लॅबला निधी देण्याची घोषणा केली. सुनील आबड यांनी स्वागत केले. याप्रसंगी मोहनलाल चोपडा, बेबीलाल संचेती,राजमल भंडारी, पारसमल साखला, अजित सुराणा, चंदनमल धाडीवाल उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha election win: Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.