पालखेडच्या आवर्तनासाठी भुजबळांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:35 AM2018-05-16T00:35:12+5:302018-05-16T00:35:12+5:30

नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Letter of Bhujbal for the Palkhed recurring | पालखेडच्या आवर्तनासाठी भुजबळांचे पत्र

पालखेडच्या आवर्तनासाठी भुजबळांचे पत्र

Next
ठळक मुद्दे छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे मागणी पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे



नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहर, तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे येवला शहारासोबतच ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेली गावे तसेच मनमाड शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. जवळपास आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा या जलाशयांमध्ये शिल्लक आहे. पालखेड धरणसमूहामध्ये येवला, मनमाड व निफाड येथील बिगरसिंचन योजनांसाठी पाणी आरक्षित असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
येवला व मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांसोबतच येवला व निफाड तालुक्यातील प्रासंगिक आरक्षण असलेले बंधारे भरून दिल्यास अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे येवला, मनमाड शहर तसेच येवला व निफाड तालुक्यातील पाणीप्रश्न लक्षात घेऊन पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Web Title: Letter of Bhujbal for the Palkhed recurring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण