बिबट्याने डोंगरेज शिवारात घोडा केला फस्त बिबट्याचा मुक्तसंचार : ग्रामस्त भयभीत, पशुधन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:46 PM2018-08-07T12:46:18+5:302018-08-07T12:46:35+5:30

वटार : डोंगरेज येथिल राणमळा पांदी लगत विस्तत गट नं.२५६ मध्ये बिबट्याने सोमवारी रात्री बाळकृष्ण खैरनार यांच्या गोठ्यावर हल्ला चडवित घोडा फस्त केला. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन धोक्यात आले आहे.

Leopard riding horse in the hill, Shivaji's funeral: The villagers fear the fear of livestock | बिबट्याने डोंगरेज शिवारात घोडा केला फस्त बिबट्याचा मुक्तसंचार : ग्रामस्त भयभीत, पशुधन धोक्यात

बिबट्याने डोंगरेज शिवारात घोडा केला फस्त बिबट्याचा मुक्तसंचार : ग्रामस्त भयभीत, पशुधन धोक्यात

Next

वटार : डोंगरेज येथिल राणमळा पांदी लगत विस्तत गट नं.२५६ मध्ये बिबट्याने सोमवारी रात्री बाळकृष्ण खैरनार यांच्या गोठ्यावर हल्ला चडवित घोडा फस्त केला. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन धोक्यात आले आहे.
परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून त्याने शेतकºयांना मुक्त दर्शनही दिले आहे. सात ते आठ कोंबड्यांना या बिबट्याने आपले भक्क्षही केले आहे . सोमवारी त्याने घोडा फस्त केल्याने शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाण्याच्या शोधात येथे बिबट्या येतो व पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपण्यासाठी मोठी काटेरी जुडपे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फत्त्ते करत असल्याने ग्रामस्थात भितीचे वातावरण आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकºयांना रात्र ही जागून काडावी लागत आहे. मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात ११ ते १२ पाळीव प्राण्याना आपला जिव गमवावा लागला आहे. घटनेची माहिती वनविभागाला कळविली आहे. वनविभागाने लक्ष घालत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरतील शेतकºयांनी केली आहे.
-----------------------

Web Title: Leopard riding horse in the hill, Shivaji's funeral: The villagers fear the fear of livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी