सटाणा शहरात मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:31 PM2018-11-16T16:31:03+5:302018-11-16T16:31:29+5:30

सटाणा:शहरात एक महीण्यापासुन तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शहर शिवसेनाप्रमुख तथा बाजार समिती संचालक जयप्रकाश सोनवणे यांच्या प्रयत्नातुन शहर वासियांना मोफत टंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ वर्धमान लुंकड यांच्या हस्ते करण्यात आला .

 Launch of water supply through Tapan city in Satana | सटाणा शहरात मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा शुभारंभ

सटाणा येथे मोफत पाणीपुरवठा सेवेचा शुभारंभ करतांना वर्धमान लुंकड समवेत लालचंद सोनवणे, प्रशांत सोनवणे, भिका सोनवणे, बिंदु शर्मा, राजन सिंह चौधरी,रामु सोनवणे, सचिन सोनवणे, निरंजन बोरसे, दिलीप शेवाळे, शेखर परदेशी, महेश सोनवणे, विक्र ांत पाटील आदी. 

googlenewsNext
ठळक मुद्देया वर्षी कसमादे परिसरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा निम्मी असल्याने आणि बागलाण व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्टयात कमी पाऊस झाला. यामुळे गिरणा व आरम नदी पावसाळ्यातही आठ ते दहा दिवसच वाहील्याने सटाणा शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.



सटाणा:शहरात एक महीण्यापासुन तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शहर शिवसेनाप्रमुख तथा बाजार समिती संचालक जयप्रकाश सोनवणे यांच्या प्रयत्नातुन शहर वासियांना मोफत टंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ वर्धमान लुंकड यांच्या हस्ते करण्यात आला .

नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये यासाठी बाजार समि ती संचालक तथा शहर शिवसेनाप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी एस. ताराचंद अ‍ॅण्ड कंपनी यांच्याकडुन पाण्याचा टॅकर उपलब्ध करून घेतला. तर ट्रक्टर व पाणी जयप्रकाश सोनवणे यांच्या मार्फत मोफत पुरवले जाणार आहे.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, बाजार समिती चे माजी सभापती भिका नाना सोनवणे, बागलाण तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत सोनवणे, माजी नगरसेवक राम सोनवणे, निरंजन बोरसे,राजुसोनी, किशोर भांगडीया,बिंदुशर्मा, राजन सिंह चौधरी, दिलीप शेवाळे, सचिन सोनवणे, महेश सोनवणे, शेखर परदेशी, बापु कर्डीवाल आदीं शिवसैनिक उपस्थित होते.



 

Web Title:  Launch of water supply through Tapan city in Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.