मालेगाव औद्योगिक वसाहतीचा उद्या शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:37 AM2019-06-13T00:37:37+5:302019-06-13T00:42:34+5:30

नाशिक : कायम चर्चेत राहिलेल्या मालेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला मुहूर्त लागला असून, मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प्यातील अजंग औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ शुक्रवारी (दि. १४) रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

Launch of Malegaon industrial colony tomorrow | मालेगाव औद्योगिक वसाहतीचा उद्या शुभारंभ

निमात आयोजित बैठकीत बोलतांना ग्रामविकासमंत्री दादा भुसे समवेत कैलास आहेर, संतोष मंडलेचा,शशीकांत जाधव,तुषार चव्हाण,प्रदीप पेशकार,संजय महाजन,सुधाकर देशमुख आदी.

Next
ठळक मुद्दे मुहूर्त लागला : निमा बैठकीत दादा भुसे यांची माहिती

नाशिक : कायम चर्चेत राहिलेल्या मालेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला मुहूर्त लागला असून, मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प्यातील अजंग औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ शुक्रवारी (दि. १४) रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित सायने आणि अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीसाठी चालना मिळाली आहे. दुसºया टप्प्यातील सायने येथील २८३ एकर आणि अजंग रावळगाव येथील ८६३ एकर जागा औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर झाली आहे. याबाबत निमात झालेल्या बैठकीत माहिती देताना ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, शेती महामंडळाच्या पाच हजार एकर पैकी ८६३ एकर जमीन ३८ कोटी रुपयात औद्योगिक वसाहतीला मिळाली आहे. 
५०० चौरस मीटर पासून ४५ एकर पर्यंतचे भूखंड तयार करण्यात आलेले आहेत.मूलभूत सेवा सुविधांसाठी शासनाने ३५ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे.जलद गतीने नियोजन करु न काम प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले. चणकापुर आणि पुनद धरणातून पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच गिरणा धरणातून शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिला आहे. सुरु वातीला शासनाने दीड हजार रु पये दर ठेवला होता.परंतु पाठपुरावा करु न आता फक्त ८०० रूपये दर ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पॉवरलुम,प्लास्टिक रिसायकल युनिट, प्लॅस्टिक रियुज युनिट असून यासह इंजिनिअरिंग उद्योग यावेत अशी अपेक्षा आहे. उद्योगांसाठी काही पॅकेज मिळावे यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरु आहेत. शुक्र वार दि.१४ रोजी दुपारी २ वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व खासदार सुभाष भामरे,आमदार असिफ शेख, महापौर रशीद शेख, एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांच्या प्रमुख उपस्थितीत पायाभूत विकास कामांचा आणि भूखंड वाटप कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशीकांत जाधव,सरचिटणीस तुषार चव्हाण,महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा,लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार,कैलास आहेर, सुधाकर देशमुख,मंगेश पाटणकर,धनंजय बेळे,रावसाहेब रकीबे,मिलिंद राजपूत,बाळासाहेब गुंजाळ,योगिता आहेर,मनीष रावळ,प्रवीण आहेर,रमेश मालू आदींसह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी,उद्योजक उपस्थित होते.
अर्थकारणात होणार बदल
दुसºया टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प्यातील अजंग रावळगाव या नवीन औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग उभे राहतील. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील. हाताला काम मिळेल. मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणात मोठे बदल होतील आणि मालेगावची जुनी ओळख मिटण्यास मदत होणार आहे.

Web Title: Launch of Malegaon industrial colony tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.