मौजे सुकेणेला चक्र धर व्याख्यानमालेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:33 PM2017-09-23T23:33:48+5:302017-09-24T00:27:15+5:30

महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री चक्रधरस्वामी व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ झाला. यंदाचे हे ३१ वे वर्ष आहे. नाशिक जिल्हा महानुभाव समिती आणि दत्त मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

 Launch of the Fun Shokane Chakra and the Vocabulary | मौजे सुकेणेला चक्र धर व्याख्यानमालेस प्रारंभ

मौजे सुकेणेला चक्र धर व्याख्यानमालेस प्रारंभ

Next

कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री चक्रधरस्वामी व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ झाला. यंदाचे हे ३१ वे वर्ष आहे. नाशिक जिल्हा महानुभाव समिती आणि दत्त मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाच्या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत सुकेणेकर बाबा हे आहेत. प्रारंभी देवास विडा अवसर करण्यात आला. व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी महंत सुकेणेकर, पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य बाळकृष्णराज सुकेणेकर, पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर, पूज्य राजधरराज सुकेणेकर, पूज्य दत्तराज सुकेणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राजधरराज सुकेणेकर यांनी संत पूजा केली. पूज्य गोपीराज शास्त्रीबाबा यांनी प्रास्ताविक करून व्याख्यानमालेचे आणि स्थान वंदनाचे महत्त्व सांगितले. प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी सर्व संतांचे स्वागत करून सुखदानी बाबा स्थान आणि देवपूजा वंदनाविषयी सांगितले. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना महात्मा पूज्य दत्तराज सुकेणेकर यांनी ज्ञान परंपरा याविषयी विचार व्यक्त केले.  याप्रसंगी सरपंच वृषाली बाळासाहेब भंडारे, माधवराव मोगल, केदू पाटील, सुधाकर भंडारे, डॉ- किरण देशमुख , संग्राम मोगल , भगवान भंडारे, दिलीप खापरे, शंकरराव काळे, निलेश दवंगे , दिलीप मोगल , आदी उपिस्थह्त होते.

Web Title:  Launch of the Fun Shokane Chakra and the Vocabulary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.