४८ हजार मिळकतदारांवर घरपट्टीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:39 AM2019-01-10T01:39:27+5:302019-01-10T01:39:47+5:30

नाशिक : शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने जीओ इन्फोसिस या कंपनीला देण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Landlocked sword on 48 thousand people | ४८ हजार मिळकतदारांवर घरपट्टीची टांगती तलवार

४८ हजार मिळकतदारांवर घरपट्टीची टांगती तलवार

Next

नाशिक : शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने जीओ इन्फोसिस या कंपनीला देण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील संभाव्य वीस हजार मिळकती असण्याची शक्यता गृहीत धरून ही मुदतवाढ पुढील महिन्याअखेरपर्यंत देण्यात आली आहे. दरम्यान, महासभेने सदोष सर्वेक्षणामुळे नोटिसा थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आत्तापर्यंत १२ हजार मिळकतदारांच्या नोटिसा रोखण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. तथापि, ज्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्या रद्द करण्यात आल्या नसल्याने ४८ हजार मिळकतदारांच्या डोक्यावर शास्तीसह वाढीव घरपट्टीची टांगती तलवार कायम आहे.
महापालिकेच्या वतीने ठराविक कालावधीनंतर मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिकेने जीओ इन्फोसीस या कंपनीला काम दिले आहे. या कंपनीने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केल्यानंतर सुमारे ६० हजार मिळकती या विनाघरपट्टी आढळून आल्या होत्या. त्यानंतर सुमारे ३ लाख ३० हजार मिळकतींचे सर्र्वेक्षण करण्यात आले. त्यातील २ लाख ६९ हजार मिळकतींवर बेकायदेशीर अथवा मंजूर नकाशाच्या पलीकडे बांधकाम करण्यात आल्याचे आढळले होते. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती शासनामार्फत न्यायालयाला पाठविल्यानंतर त्यावरून बरीच भवती न भवती झाली होती. त्यानंतर अगोदरच्या ६० हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सर्वेक्षणच सदोष असल्याचे आढळल्याने महासभेत प्रशासनाला तोंडघशी पडावे लागले होते.

Web Title: Landlocked sword on 48 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.