बीएलओंच्या मानधन वाटपात लाखोंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:10 AM2018-05-10T00:10:20+5:302018-05-10T00:10:20+5:30

नाशिक : निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंच्या (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) मानधन वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय घेतला जात असून, दोन वर्षांपासून बीएलओ शासनाचे मानधन जर घेत आहेत, तर मग मतदार याद्यांचे काम का होत नाही, अशी शंका घेऊन करण्यात आलेल्या चौकशीतून फसवणूक झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. विशेष म्हणजे, सरकार दप्तरी नोंद असलेल्या बीएलओंना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर त्याची दखल न घेतली गेल्याने या बीएलओंच्या अस्तित्वाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 Lakhs of scams in honorarium of BLs | बीएलओंच्या मानधन वाटपात लाखोंचा घोटाळा

बीएलओंच्या मानधन वाटपात लाखोंचा घोटाळा

Next
ठळक मुद्देकाम न करताच वाटप मालेगाव, नाशिकचा समावेश

नाशिक : निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंच्या (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) मानधन वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय घेतला जात असून, दोन वर्षांपासून बीएलओ शासनाचे मानधन जर घेत आहेत, तर मग मतदार याद्यांचे काम का होत नाही, अशी शंका घेऊन करण्यात आलेल्या चौकशीतून फसवणूक झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. विशेष म्हणजे, सरकार दप्तरी नोंद असलेल्या बीएलओंना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर त्याची दखल न घेतली गेल्याने या बीएलओंच्या अस्तित्वाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
विशेष म्हणजे, यासंदर्भात आठवडाभरापूर्वीच बीएलओंच्या मानधन वाटपात घोटाळा केल्याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
करण्यात आला असल्यामुळे प्रशासनाने ही सारी बाब अधिक गांभीर्याने घेतली
आहे.  त्यांचा सर्वाधिक संशय मालेगाव व नाशिक शहर मिळून सुमारे दीड हजार बीएलओंवर व त्यांना मानधन अदा करणाऱ्या निवडणूक नायब तहसीलदार व कर्मचाºयांवर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेऊन त्यासाठी मतदान केंद्रनिहाय ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र नाही अशांच्या घरोघरी जाऊन त्यांची छायाचित्रे गोळा करणे, तर ज्या मतदारांचे यादीत कृष्णधवल छायाचित्र आहे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र गोळा करण्याचे काम बीएलओंना सोपविले होते. त्यासाठी प्रत्येक बीएलओना त्यांच्या नेमणुकीच्या मतदान केंद्रातील मतदारांची यादी पुरविण्यात आली होती. नाशिक जिल्ह्णातील मालेगाव व नाशिक शहरातील चार असे पाच विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य दहा मतदारसंघांतील बीएलओंनी सदरचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जे मतदार सापडले त्यांची छायाचित्रे गोळा करून निवडणूक यंत्रणेकडे सुपूर्द केली; परंतु मालेगाव बाह्ण मतदारसंघातील एकाही बीएलओने काम केले नाही, तर नाशिकमधील पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली या चार मतदारसंघांतही जेमतेम काम होऊ शकले आहे. यासंदर्भात वारंवार निवडणूक नायब तहसीलदारांना सूचना करूनही त्यांच्याकडून बीएलओ काम करीत नसल्याची सबब देण्यात आली. परिणामी आयोगाने दिलेली मुदत टळूनही मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्यावर यासंदर्भातील संशय अधिक बळावला आहे.
 
Web Title:  Lakhs of scams in honorarium of BLs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा