अपुऱ्या जलस्त्रोतांमुळे लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजना अल्पजीवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 06:13 PM2018-09-11T18:13:14+5:302018-09-11T18:13:43+5:30

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सार्वजनीक पाणीपुरवठा योजना अपुºया जलस्त्रोतांमुळे अल्पजीवी ठरत असुन लाखों रु पये खर्चून बनविलेल्या या योंजनांकडे या भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

 Lack of water supply schemes for poor water resources | अपुऱ्या जलस्त्रोतांमुळे लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजना अल्पजीवी

अपुऱ्या जलस्त्रोतांमुळे लाखो रुपयांच्या पाणी पुरवठा योजना अल्पजीवी

Next

कंधाणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सार्वजनीक पाणीपुरवठा योजना अपुºया जलस्त्रोतांमुळे अल्पजीवी ठरत असुन लाखों रु पये खर्चून बनविलेल्या या योंजनांकडे या भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य आरम व हत्ती नदीवर अंवलंबून आहे. नदीला पाणी तर गावाला पाणी असे समीकरणच रूढ झाले आहे. बºयाच गावांच्या पाणीपुरवठा करणाºया विहीरी नदी काठांनवर आहेत. तर काहींना नदीच्या पाणी सिंचनाचा फायदा होतो. आरम नदीवर कंधाणे, डांगसौंदाणे, बुंधाटे, दहंीदुले, निकवेल, चौंधाणे, मुंजवाड या गावांच्या सार्वजनीक पाणीपुरवठा योजना असुन हत्ती नदीवर जोरण, मोरकुरे, पठावा, किकवारी, विंचूरे, तरसाळी, गावांच्या पाणीपुरवठा योजना अंवलंबून आहेत आरम नदीवर केळझर धरण असुन त्याची क्षमता ६०३.३० दलघफु आहे . तर हत्ती नदीवर पठावा लघूप्रकल्प असुन त्याची क्षमता ६८ दलघफु आहे. आरम नदीला पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याचे रोटेशन असते पण हत्ती नदीवरील पठावा लघूप्रकल्प असल्याने पिण्याचे पाण्याचे रोटेशन नाही. त्यामुळे या नदीवरील पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य पावसाच्या पाण्यावर अंवलंबून आहे . दोन्ही नद्यांवर पाणी आडविण्याच्या सोयी नाहीत. पावसाळयातील पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात या भागातील बºयाच गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते . या दोन्ही नद्यांवर बंधारे बांधून येथील पाणीपुरवठा योजना पुर्नजीवित करणे गरजेचे आहे. सध्या तालूक्यात सिंचन प्रश्नावरून आरोप प्रत्यारोप सुरू असुन सुंदोपसुंदी सुरू आहे. पण या भागातील सिंचन प्रश्नाकडे डोळेझाक केली जात आहे.

Web Title:  Lack of water supply schemes for poor water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.