भरधाव ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार : बोधलेनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:07 PM2017-09-28T16:07:23+5:302017-09-28T16:08:34+5:30

दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील मुख्य महामार्गावरून एक इसम रस्ता ओलांडत होता. दरम्यान, अज्ञात ट्रकने भरधावपणे वाहतूक करीत सदर इसमाला धडक दिली.

Killed in road accident in Bodoland | भरधाव ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार : बोधलेनगर

भरधाव ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार : बोधलेनगर

Next
ठळक मुद्दे जखमी अवस्थेत मदतीसाठी याचना करणारा अज्ञात इसमाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेरस्त्यातच तो मरण पावला. मुख्य महामार्गावरून एक इसम रस्ता ओलांडत होता.

नाशिक : पुणे महामार्गावरून जाणाºया भरधाव ट्रकने एका अनोळखी ५२ वर्षीय इसमाला रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडके त गंभी जखमी झालेल्या इसमाचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील मुख्य महामार्गावरून एक इसम रस्ता ओलांडत होता. दरम्यान, अज्ञात ट्रकने भरधावपणे वाहतूक करीत सदर इसमाला धडक दिली. धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेला इसम रस्त्यावर अत्यवस्थ अवस्थेत पडलेला असताना ट्रकचालकाने त्याला रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. जखमी अवस्थेत मदतीसाठी याचना करणारा अज्ञात इसमाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले; मात्र रस्त्यातच तो मरण पावला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. याप्रकरणी अधिक तपास हवालदार रवींद्र मुंतोडे करीत आहेत.

Web Title: Killed in road accident in Bodoland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.