पाच लाख शेतकऱ्यांना खरीप नुकसानीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:31 AM2019-02-07T00:31:51+5:302019-02-07T00:32:33+5:30

नाशिक : अपुºया व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने जेमतेम ८५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात पाठविल्याने ते थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

Kharif damages help to five lakh farmers | पाच लाख शेतकऱ्यांना खरीप नुकसानीची मदत

पाच लाख शेतकऱ्यांना खरीप नुकसानीची मदत

Next
ठळक मुद्देअद्यापही शासनाकडून साडेतीनशे कोटी रुपये येणे बाकी

नाशिक : अपुºया व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने जेमतेम ८५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात पाठविल्याने ते थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकºयांच्या हातून पाण्याअभावी खरिपाची पिके गेली. काही गावांमध्ये पुरेशा पेरण्या होऊ शकल्या नाहीत, तर काही गावांना पावसाळ्यात टॅँकरने पाणी पुरवावे लागले. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८२ टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले तरी, त्यात बहुतांशी पाऊस पावसाचे माहेरघर येथेच पडला. त्यामुळे मालेगाव, नांदगाव, सिन्नर, चांदवड, देवळा, बागलाण, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्णासारखी परिस्थिती राज्यातही अनेक भागात निर्माण झाल्याने राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र सरकारने राज्याला मदत करावी यासाठी अहवाल पाठविला. त्यानुसार केंद्रीय पथकाने नाशिक जिल्ह्णातील दुष्काळी गावांना भेट देऊन पाहणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यासाठी काही मदत जाहीर केली असली तरी, तत्पूर्वीच राज्य सरकारने खरिपात नुकसान झालेल्या शेतकºयांची माहिती गोळा करून त्याआधारे अंदाजित नुकसानीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांतील ५ लाख ४१ हजार २५७ शेतकºयांच्या चार लाख ८० हजार ६६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर केला.
शासनाने मे २०१३ मध्ये घेतलेल्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीच्या निर्णयाप्रमाणे कोरडवाहू शेतकºयाला प्रती हेक्टरी ६८०० याप्रमाणे दोन हेक्टरप्रमाणे तर बागाईती पिकासाठी १३,५०० रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत व फळबागासाठी १८००० रुपये निश्चित केले आहेत. त्यानुसार जिल्ह्णातील शेतकºयांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्णासाठी ४२६ कोटी ७८ लाख ५६ हजार १५१ रुपयांची मदतीची गरज असून, तसा प्रस्तावही शासनाकडे रवाना केला आहे. शासनाने गेल्या आठवड्यात ८५ कोटी २६ लाख ३३ हजार ६० रुपयांची मदत पाठविली असून, आठही तालुक्यांमध्ये समसमान पद्धतीने त्याचे वाटप सुरू झाले आहे. मात्र अद्यापही शासनाकडून साडेतीनशे कोटी रुपये येणे बाकी असून, शेतकºयांना त्याची प्रतीक्षा लागून आहे.

Web Title: Kharif damages help to five lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी