जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:39 AM2018-03-24T00:39:14+5:302018-03-24T00:39:14+5:30

शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

Junketry movement should be raised: Kulkarni | जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे : कुलकर्णी

जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे : कुलकर्णी

Next

नाशिक : शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. भा. कुलकर्णी यांनी केले आहे. जलजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. येथील परशुराम साईखेडकर सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कुलकर्णी पुढे म्हणाले, पाण्याचे महत्त्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवर भर दिला गेला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत हे उद्दिष्ट समोर ठेवून काम केले तरच ते शक्य आहे. जलतज्ज्ञ सुरेश कुटे यांनी पाणी हा जीवनशैलीचा भाग असल्याने जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादित न राहता याविषयी निरंतर प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी प्रास्ताविकात जलजागृती सप्ताहानिमित्त आयो जित उपक्रमांची माहिती दिली.  गिरणा नदी खोरे प्रकल्प यांनी ‘पाण्याला लागली तहान’ हे लघुनाट्य, तर नाना साळवे यांनी वामनदादा कर्डक यांची ‘पाणी वाढ गं माय’ ही कविता सादर केली. कार्यक्रमास महापालिकेचे शहर अभियंता ए. व्ही. धनाईत, कार्यकारी अभियंता प्रवीण गायकवाड, दिलीप मुसळे, राजेश शिंदे, गिरीश सौंदाणी आदी उपस्थित होते. जल दिनानिमित्त रांगोळी, चित्रकला आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विक्रम गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह ‘व्यथा’ या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. त्यातून शिक्षण, पाणी, आरोग्य, जलसंवर्धनाचे महत्त्व मांडण्यात आले. तृप्ती बोरसे हिचे ‘पाणीप्रश्न आणि मी’ या विषयावर व्याख्यान झाले.

Web Title: Junketry movement should be raised: Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी