येवला येथील जनता विद्यालयातील  माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:18 AM2018-02-27T00:18:49+5:302018-02-27T00:18:49+5:30

येथील जनता विद्यालयातील १९७५च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे सर्व विद्यार्थी तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले. आपण काय करतो? मुलबाळ काय काम करतात? याची माहिती एकमेकांना देत असताना यासह संवेदनांची जाणीव, डोळ्यात आलेले आनंदाश्रू, येथील जनता विद्यालयात जाऊन आपल्या वर्गामध्ये बेंचवर बसून पूर्वी अनुभवलेल्या शालेय जीवनाचा अनुभव घेतला.

 Jana Vidyalaya's former students' affectionate meeting at Yeola | येवला येथील जनता विद्यालयातील  माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

येवला येथील जनता विद्यालयातील  माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

googlenewsNext

येवला : येथील जनता विद्यालयातील १९७५च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हे सर्व विद्यार्थी तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले. आपण काय करतो? मुलबाळ काय काम करतात? याची माहिती एकमेकांना देत असताना यासह संवेदनांची जाणीव, डोळ्यात आलेले आनंदाश्रू, येथील जनता विद्यालयात जाऊन आपल्या वर्गामध्ये बेंचवर बसून पूर्वी अनुभवलेल्या शालेय जीवनाचा अनुभव घेतला. सायंकाळी घरी परतताना लहानपण देगा देवा ! असे म्हणत अनोखे स्नेहसंमेलन झाले. या स्नेहसंमेलनाची सुरुवात सुष्मा गुजराथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. सत्यनारायण  त्रिपाठी, किरण क्षत्रिय, भास्करराव शिंदे, रवींद्र रोडे, सुधाकर भांबारे, बलदेव गंभीर, योगेश गुजराथी, आनंद भांबेरे, मुकुल पटेल, लाला शेजपुरे, संजू पटेल, उषा जाधव, शरद भालेराव, प्रकाश निकाळे, मुकुंद गांगुर्डे, चेतना गुजराथी, सुरेखा शुळ, हिरा शिंदे, आरती पटेल, रेखा जोशी, उषा खर्डे आदींनी आपल्या प्रापंचिक व व्यावसायिक जबाबदारीतून वेळ काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला.  सन १९७५ सालच्या जनता विद्यालय येवला येथील अकरावी मॅट्रिकच्या शेवटच्या बॅचच्या  सुमारे तत्कालीन ७५ शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल ४३ वर्षांनंतर एकत्र येऊन कोटमगाव येथे स्नेहसंमेलन केले. अ‍ॅड. माणिकराव शिंदे, किरण क्षत्रिय, संदीप बावडेकर, जगन्नाथ येलगट यांच्या संकल्पनेतून हे स्नेहसंमेलन पार पडले.

Web Title:  Jana Vidyalaya's former students' affectionate meeting at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.