२३ वर्षांनी वाजली श्रीराम विद्यालयात घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:04 AM2018-06-18T00:04:10+5:302018-06-18T00:04:10+5:30

तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व ज्यू. महाविद्यालयात १९९४-९५ इयत्ता दहावी क बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१६) श्रीराम विद्यालयात संपन्न झाला. तब्बल २३ वर्षांनंतर दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

It took place 23 years later in the morning of Shri Ram Vidyalaya | २३ वर्षांनी वाजली श्रीराम विद्यालयात घंटा

२३ वर्षांनी वाजली श्रीराम विद्यालयात घंटा

googlenewsNext

पंचवटी : तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व ज्यू. महाविद्यालयात १९९४-९५ इयत्ता दहावी क बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१६) श्रीराम विद्यालयात संपन्न झाला. तब्बल २३ वर्षांनंतर दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.  या स्नेह व माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाबूराव मुखेडकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोंडाजी मुखेडकर, सुभाष पाटील, जितेंद्र शिसोदे, एस. टी. शिंदे, जालिमसिंग राजपूत, गंगाराम ढाकणे, मुरलीधर देवघरे, श्रीमती बोरसे, श्रीमती फोकणे, पवार आदींसह शाळेचे माजी शिक्षक उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी राहुल कुलकर्णी, जितेंद्र पाटील, गिरीश जाधव, संदीप झिरवाळ, नीलेश शेळके यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.  यावेळी विद्यार्थी मित्रांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत ९५च्या विद्यार्थीदशेतील विद्यार्थी सध्या काय व्यवसाय करतात याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील किस्से सांगितले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना वही व पेन भेटवस्तू म्हणून दिल्या. या मेळाव्याला ७०हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.  या मेळाव्याला भाऊसाहेब मोरे, राहुल गायकवाड, गजानन ढाकणे, संदीप ताजणे, भाऊसाहेब गिते, तुषार वाणी, किरण हुगाडे, अमित बाळ, नितीन पाटील, सुवर्णा देवरे, वृषाली राजपूत, वर्षा पाटील, स्वाती कलंत्री, अनघा जानोरकर, वैशाली काळे, श्वेता बैरागी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल मुखेडकर, राहुल फोकणे यांनी आभार मानले.

Web Title: It took place 23 years later in the morning of Shri Ram Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा