नाशिक महापालिकेच्या महिलांकडूनसदस्यां पुणे मनपातील योजनांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:00 AM2017-12-09T00:00:43+5:302017-12-09T00:27:41+5:30

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. ८) पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील समितीमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या. पुणे महापालिकेतील काही योजना नाशिक महापालिकेतही राबविण्याचा विचार समितीच्या सभापती सरोज अहिरे यांनी बोलून दाखविला आहे.

 Inspection of schemes of women from Nashik municipal corporation in Pune | नाशिक महापालिकेच्या महिलांकडूनसदस्यां पुणे मनपातील योजनांची पाहणी

नाशिक महापालिकेच्या महिलांकडूनसदस्यां पुणे मनपातील योजनांची पाहणी

Next

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. ८) पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील समितीमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या. पुणे महापालिकेतील काही योजना नाशिक महापालिकेतही राबविण्याचा विचार समितीच्या सभापती सरोज अहिरे यांनी बोलून दाखविला आहे.  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोज अहिरे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्य कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे, शीतल माळोदे, सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे व पूनम मोगरे, समीना मेमन यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाºया योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीचे कामकाज कशाप्रकारे चालते, समितीसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी प्राप्त होतो किंवा नाही, कोणत्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलेले आहे याची माहिती घेण्यात आली.  ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय महिलांसाठी स्वयंरोजगाराची विविध साधनेही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही काही योजना व उपक्रम राबविण्याचा मनोदय यावेळी सदस्यांनी व्यक्त केला. दरम्यान, तेथील पदाधिकाºयांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.
शिष्यवृत्तीसाठी  २१ कोटींचा खर्च
पुणे महापालिकेमार्फत दहावी आणि बारावी परीक्षेत ८० टक्क्यांवर गुण मिळविणाºया विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी पुणे महापालिका सुमारे २१ कोटी रुपये दरवर्षी खर्च करते. स्लम भागातील महिलांना संगणकाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. गरीब व गरजू विधवांना दहा हजार रुपये मदत म्हणून दिली जाते.

 

Web Title:  Inspection of schemes of women from Nashik municipal corporation in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.