निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुननिर्माण कामासाठी लवकरच स्वतंत्र अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 04:41 PM2018-01-12T16:41:36+5:302018-01-12T16:42:05+5:30

त्र्यंबकेश्वर :- निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुर्ननिर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकिय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, वैद्यकिय शिक्षण व खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

Independent Officer soon for the construction of Nivruttinath Maharaj Temple | निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुननिर्माण कामासाठी लवकरच स्वतंत्र अधिकारी

निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुननिर्माण कामासाठी लवकरच स्वतंत्र अधिकारी

Next

त्र्यंबकेश्वर :- निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुर्ननिर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकिय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, वैद्यकिय शिक्षण व खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची पालकमंत्री श्री. महाजन यांनी पत्नी साधना यांच्यासह आज पहाटे शासकिय महापूजा केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांत भारती, सचिव पवनकुमार भुतडा, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरूरे, पंडितराव कोल्हे, कैलास चोथे भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, गटनेते समीर पाटणकर, सागर उजे, विष्णू दोबाडे, दीपक गिते, भारती बदादे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे, अनिता बागुल, माधवी भुजंग, शितल उगले, मंगला आराधी, संगिता भांगरे, शिल्पा रामायणे संत साहित्याचे अभ्यासक गुट्टे महाराज यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. श्री. महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व श्रध्देमुळे मंदिराचे वेगळे महत्व असून मंदिराची नव्याने भव्य वास्तू उभी राहिल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भमिपूजन झाल्याने या काळ्या पाषाणात उभ्या साकारणाºया या मंदिराच्या कामास गती येणार आहे. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट कामांमुळे येथील रस्ते चांगले आहेत. तसेच भाविकांसाठी असंख्य सुविधा निर्माण झाल्या आहेत. येथील निसर्ग संपन्न डोंगररांगा, तलाव, पौराणिक ठिकाणे यांचा पर्यटन विकासासाठी देखील उपयोग होईल. ते म्हणाले, कुंभमेळ्याची जागतिक वारसा म्हणून ‘यूनो’ ने नोंद घेतली असून यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख जगासमोर आली आहे. ही यात्रा ‘निर्मल वारी’ होण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. विविध संघटना, सामाजिक संस्थाच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंढरपूर व आळंदी येथील प्रमाणेच हे स्वच्छ निर्मल वारीचे काम येथे झाले आहे असे महाजन म्हणाले. यापूर्वी मंदिराचे पुजारी जयंत गोसावी यांनी निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीची विधिवत पंचामृत पूजाविधीचे मंत्रपठण केले. यावेळी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Independent Officer soon for the construction of Nivruttinath Maharaj Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक