तापमानात वाढ; पारा ३८.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:30 AM2019-04-09T01:30:20+5:302019-04-09T01:30:37+5:30

नाशिक : शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली असून, सोमवारी (दि.८) नाशिककरांना उष्म्याचा अधिकच त्रास जाणवला. सोमवारी शहराचे कमाल ...

 Increase in temperature; Mercury 38.4 | तापमानात वाढ; पारा ३८.४

तापमानात वाढ; पारा ३८.४

Next

नाशिक : शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली असून, सोमवारी (दि.८) नाशिककरांना उष्म्याचा अधिकच त्रास जाणवला. सोमवारी शहराचे कमाल तापमान ३८.४ अंश इतके नोंदविले गेले. एप्रिलचा पहिला आठवडा उलटला असून, अद्याप मे महिना उजाडला नसून तापमानाने मार्चअखेर तसेच चालू आठवड्याच्या प्रारंभी चाळिशी ओलांडल्याने नाशिककरांना मे महिन्यातील उष्म्याची चिंता सतावते आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रखर ऊन नाशिककर अनुभवत आहेत. दरवर्षी शहराच्या उष्म्यामध्ये वाढ होत असून, उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत आहे, तर दुसरीकडे पर्जन्यमानाचे प्रमाण घटत असल्याने जिल्ह्यावर आज दुष्काळाचे सावट पहावयास मिळत आहे.
निसर्गाच्या अपरिमित हाणीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे ऋतूचक्राचेही संतुलन हरविल्याचा अनुभव नाशिककरांना वारंवार येत आहे. यावर्षी मार्चअखेरपासूनच नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Web Title:  Increase in temperature; Mercury 38.4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.