जिल्हा न्यायालयातील नवीन न्यायालयीन कक्षाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:08 AM2018-06-05T01:08:10+5:302018-06-05T01:08:10+5:30

जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या अडीच एकर जागेत सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर बारामध्ये चार नूतन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली असून, या कक्षांचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि़४) करण्यात आले़

 Inauguration of new judicial cell of the District Court | जिल्हा न्यायालयातील नवीन न्यायालयीन कक्षाचे उद्घाटन

जिल्हा न्यायालयातील नवीन न्यायालयीन कक्षाचे उद्घाटन

Next

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या अडीच एकर जागेत सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर बारामध्ये चार नूतन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली असून, या कक्षांचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि़४) करण्यात आले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आऱ आऱ हांडे आदींसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.  जिल्हा न्यायालयातील वाढते दावे, खटले तसेच वकिलांची संख्या पाहता न्यायालयाचे विस्तारीकरण होणे गरजेचे होते़ सद्यस्थितीतील जागा अपुरी पडत असल्याने  न्यायालयालगतची पोलिसांच्या ताब्यातील पाच एकर जागेची मागणी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती़ नाशिक बार असोसिएशन व अ‍ॅड़ का़ का़ घुगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार उच्च न्यायालयाने पोलिसांकडील अडीच एकर जागा देण्याचे आदेश दिल्यानंतर जागेचे हस्तांतर करण्यात आले़ या जागेवर सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर १२ मध्ये चार दिवाणी न्यायालयांसाठी नवीन कक्ष तयार करण्याचे आदेश प्रधान न्यायाधीश शिंदे यांनी दिले होते़
न्यायालयास मिळालेल्या या जागेवरील बॅरेक नंबर बारामध्ये चार नवीन न्यायालयीन कक्ष तयार करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सोमवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ या ठिकाणी चार दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालये स्थलांतरित करण्यात आली असून, त्यांचे कामकाजही आजपासून सुरू करण्यात आले़ जिल्हा न्यायालय प्रशासन व नाशिक बार असोसिएशन यांनी नूतन कक्षाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते़ यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुधीरकुमार बुक्के, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर, अ‍ॅड. श्रीधर माने, असोसिएशनचे पदाधिकारी अ‍ॅड. प्रकाश आहुजा, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. श्यामला दीक्षित, अ‍ॅड. संजय गिते, अ‍ॅड. हर्षल केंगे, अ‍ॅड. महेश लोहिते यांसह वकील व न्यायाधीश मोठ्या संख्येने हजर होते.

Web Title:  Inauguration of new judicial cell of the District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक