प्रशिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा : दत्ता पडसलगीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:54 AM2018-07-12T00:54:04+5:302018-07-12T00:55:01+5:30

The important stage of training life: Datta Padselgikar | प्रशिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा : दत्ता पडसलगीकर

प्रशिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा : दत्ता पडसलगीकर

Next

नाशिक : प्रशिक्षण कालावधी हा पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, यावेळी घेतलेले परिश्रम भविष्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उपयोगी पडतात़ प्रामाणिक व खडतर प्रयत्नाने पूर्ण केलेले प्रशिक्षणच उत्कृष्ट अधिकारी होण्यास कारणीभूत ठरतात असे मार्गदर्शन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाºयांना केले़
महासंचालक पडसलगीकर हे बुधवारी (दि. ११) नाशिक दौ-यावर होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात त्यांनी नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन सूचना केल्या़ यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शन केले. पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर व उपसंचालक नंदकुमार ठाकूर यांनी अकादमीसाठी आवश्यक बाबींचे सादरीकरण केले़  यावेळी पडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी ही राज्याची शिखर संस्था आहे़ अकादमीने सुरू केलेले ई-लर्निंग हे राष्ट्रीय पातळीवर पायलट प्रकल्प म्हणून राबविले जाते़ पोलीस अधिकाºयांचे कौशल्य विकसित होण्याकरिता त्यांच्या आॅनलाइन परीक्षा घ्याव्यात अशा सूचनाही पडसलीकर यांनी करून अकादमीच्या विविध योजनांबाबत शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी पडसलगीकर यांच्या हस्ते अकादमीतील गुलाबपुष्प उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
ई-लर्निंग हे राष्ट्रीय पातळीवर पायलट प्रकल्प
पडसलगीकर यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी ही राज्याची शिखर संस्था आहे़ अकादमीने सुरू केलेले ई-लर्निंग हे राष्ट्रीय पातळीवर पायलट प्रकल्प म्हणून राबविले जाते़ पोलीस अधिकाºयांचे कौशल्य विकसित होण्याकरिता त्यांच्या आॅनलाइन परीक्षा घ्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title: The important stage of training life: Datta Padselgikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस