इगतपुरी : ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:15 AM2019-02-22T01:15:52+5:302019-02-22T01:16:14+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाइन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. मतमोजणी २५ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून, इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.

Igatpuri: Election of 30 Gram Panchayats announced | इगतपुरी : ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित

इगतपुरी : ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित

Next
ठळक मुद्दे२४ मार्चला मतदान : ५ मार्चपासून उमेदवारी दाखल करता येणार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाइन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. मतमोजणी २५ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून, इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील वाकी, मुरंबी, देवळे, इंदोरे, रायांबे, उभाडे, मालुंजे, धामणी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्णोली, सोनोशी, समनेरे, बोरटेंभे, कावनई, खैरगाव, खडकेद, नांदूरवैद्य, अधरवड, शेवगेडांग, बारशिंगवे, कोरपगाव, मांजरगाव, कांचनगाव, बेलगाव कुºहे, शेणवड बुद्रुक, पिंपळगाव मोर, पाडळी देशमुख, मायदरा धानोशी, पिंपळगाव भटाटा या ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आॅनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी दि. ५ ते ११ मार्च मुदत देण्यात आली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्च रोजी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी १३ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हवाटप केले जाईल. अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी १३ मार्च रोजी होणार आहे. दि. २४ मार्च रोजी सकाळी ७. ३० ते ५. ३० दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी २५ मार्चला होईल.
दरम्यान ३० ग्रामपंचायतींमध्ये तुल्यबळ लढती होणार असून, यंदा प्रथमच थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने चुरस पाहायला मिळेल. इच्छुकांची धावपळ उडाली असून, आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. निवडणूक यंत्रणाही सक्रियतेने नियोजन करीत आहे. ३० गावांसाठी निवडणूक घेण्यासाठी आयोगाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. निवडणुकीशी संबंधितांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. निष्पक्ष, निर्भीड वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आम्ही सक्रि य आहोत.
- वंदना खरमाळे, तहसीलदार, इगतपुरी

Web Title: Igatpuri: Election of 30 Gram Panchayats announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.