लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीला ठार मारणारा पती तुरूंगात फोडणार खडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:12 PM2019-04-21T14:12:58+5:302019-04-21T14:15:12+5:30

भाजी कापण्याच्या चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहूल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला होता.

The husband who killed his wife at the wedding's wedding would be imprisoned in jail | लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीला ठार मारणारा पती तुरूंगात फोडणार खडी

लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीला ठार मारणारा पती तुरूंगात फोडणार खडी

Next
ठळक मुद्दे गळ्यावरही सपासप वार केले.सारीपुत्रविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ३ मे २०१८ साली सिडको परिसरात घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता.
सिडकोमधील पंडीतनगरमध्ये राहणारा आरोपी सारीपुत्र पुंजाराम शिंदे याने त्याची पत्नी रमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गवंडी काम करणारा सारीपुत्र रमा माहेरच्यांशी नेहमीच फोन वर बोलत असल्याने तीच्यासोबत वाद घालत होता. यावेळी तो तिला जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. ३ मे २०१८ रोजी लग्नाचा वाढिदवस असल्याने दुपारी हे दांम्पत्य आपल्या खोलीत असताना ही घटना घडली होती. आरोपी सारीपुत्र व रमा दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या खोलीतील पलंगावर बसलेले असतांना त्याने पत्नीस अनैतिक संबधाबाबत विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रमाने त्यास चांगलेच खडसावल्याने संतप्त झालेल्या सारीपुत्रने जवळच पडलेला भाजी कापण्याच्या चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहूल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला होता. या घटनेत रमा जागीच ठार झाल्याने राहूल शिंदे याने दिलेल्या तक्र ारीवरून अंबड पोलीसांनी आरोपी सारीपुत्रविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस.बी.खडके यांनी करून आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयापुढे हजर क रत दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकिल रविंद्र निकम यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने परिस्थीतीजन्य आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे आरोपी सारीपुत्र यास दोषी धरले व जन्मठेप आण २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: The husband who killed his wife at the wedding's wedding would be imprisoned in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.