गारठयाने नाशिककरांना भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:43 AM2017-11-29T11:43:44+5:302017-11-29T11:44:32+5:30

Hurdhudi full of Nashikar | गारठयाने नाशिककरांना भरली हुडहुडी

गारठयाने नाशिककरांना भरली हुडहुडी

googlenewsNext
ठळक मुद्देपारा १०.८ अंशावर : पिकांवर परिणाम, संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ


नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेले. तर त्याच वेळी निफाडचे तपमान सर्वात कमी म्हणजे ८.७ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या बुधवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते. शहराच्या किमान तपमानाचा पारा मागील आठवड्यात चढता राहिला; मात्र त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची तीव्रता शहरात वाढल्याचे जाणवत आहे.
रविवारपासून हवेमध्ये कमालीचा गारवा जाणवू लागल्याने पाºयामध्येही घसरण होत आहे. या उतरत्या पाºयामुळे आणि वाढत्या थंडीमुळे पिकांवरही त्याचा परिणाम जाणवतो असून दिवाळीपुर्वीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर आता परत एकदा निसर्गाचा फटका सहन करावा लागणार की काय अशी भिती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वाढत्या गारव्यामुळे अबालवृद्धांना सर्दी, खोकला, ताप आदि संसर्गजन्य आजाराची लागण होत असून आजारांमुळे गुलाबी थंडीचा आस्वाद घेणे मुश्किल झाले आहे. एकीकडे किमान तपमानाचा पारा उतरता असला, तरी दुसरीकडे मात्र कमाल तपमानाचा पारा चढता असल्याने नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटकाही जाणवत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा निर्माण होत असून, थंडी जाणवण्यास सुरुवात होत आहे. एकूणच सध्या नाशिककर हिवाळ्यासोबत उन्हाळाही अनुभवत आहेत. सकाळी १० वाजेपासून नाशिककर उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर उकाडाही अनुभवत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वातानुकूलन यंत्रासह पंख्याचा वापर नागरिक दुपारी करत आहेत. संध्याकाळपासून थंडीची तीव्रता जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे गोदाकाठावर व तपोवन परिसरात उघड्यावर राहणाºया भटक्या कुटुंबीयांकडून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी किमान तपमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला होता. यावर्षी केवळ एक अंशाने यादिवशी पारा चढता राहिला आहे.

Web Title: Hurdhudi full of Nashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.