हेल्पलाईन १०९१ : ग्रामिण भागातील महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखणार ‘दामिनी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:44 PM2017-09-26T20:44:40+5:302017-09-26T20:49:07+5:30

विवाहितेचा विविध कारणांवरुन होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्त्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून अपात्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामिण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

Helpline 109 9: Damini will prevent injustice and injustice to women in rural areas | हेल्पलाईन १०९१ : ग्रामिण भागातील महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखणार ‘दामिनी'

हेल्पलाईन १०९१ : ग्रामिण भागातील महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखणार ‘दामिनी'

Next
ठळक मुद्दे‘दामिनी’ पथकाकडून तत्काळ संकटसमयी महिलांना मदत ‘१०९१’वर संपर्क साधल्यास तत्काळ महिला पोलीस अधिकारी मदतीसाठी पोहचेल ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले

नाशिक : विवाहितेचा विविध कारणांवरुन होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्त्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून अपात्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामिण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
निमित्त होते, जिल्ह्याच्या ग्रामिण पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘सखी’ मेळाव्याचे. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, अभिनेत्री प्रिया तुळजापुरकर, योगा प्रशिक्षक प्रज्ञा पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, बचत गटाच्या आश्विनी बोरस्ते, अ‍ॅड. दिपाली खेडकर, पोलीस अधिक्षक संजय दराडे, उपअधिक्षक अतुल झेंडे, अपर उपअधिक्षक विशाल गायकवाड, रोहिणी दराडे, दिपिका झेंडे, प्रियंका दराडे आदि उपस्थित होते.
यावेळी शहरासह ग्रामिण भागातील त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, येवला, सटाणा, कळवण, सिन्नर, मनमाड, चांदवड आदि तालुक्यांमधील गावागावांतून विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी दराडे म्हणाले, आधुनिक युगात पुरूषांच्या तुलनेत महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही; मात्र महिला, युवतींच्या बाबतीत घडणाºया गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनाही वाढल्या आहेत. यासाठी महिलांनी सक्षम होऊन त्याविरोधात जागरुकता दाखवून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे व पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी पुरक ठरणारा ‘आता बस्स...!’ हे अभियान ग्रामिण पोलीस दलाकडून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे चार हजाराहूंन अधिक महिला या सखी मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.


असे आहे पथक ; करा १०९१वर संपर्क
‘दामिनी’ पथकाकडून तत्काळ संकटसमयी महिलांना मदत उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी एक मदतवाहिनी क्रमांक देण्यात आला आहे. ‘१०९१’या क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी मदतीसाठी संबंधितांकडे पोहचेल, असे यावेळी सांगण्यात आले. पथकामध्ये एक महिला पोलीस अधिकारी व चार कर्मचाºयांची एका वाहनावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण सहा वाहने जिल्ह्याच्या रस्त्यावर धावणार आहेत. चार अधिकारी व २४ महिला कर्मचाºयांचे ‘दामिनी’ पथक आहे.

Web Title: Helpline 109 9: Damini will prevent injustice and injustice to women in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.