हृदयात विचारांची ज्योत प्रज्वलित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:25 PM2019-02-08T23:25:38+5:302019-02-09T00:33:59+5:30

बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले.

Heartburn should be ignited in the heart | हृदयात विचारांची ज्योत प्रज्वलित करावी

हृदयात विचारांची ज्योत प्रज्वलित करावी

googlenewsNext
ठळक मुद्देनिवृत्ती महाराज यांचे प्रतिपादन

नाशिकरोड : बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले.
देवळालीगावातील दंड्या मारुती मंदिराच्या हरिनाम सप्ताहातील आर्टिलरी सेंटररोड येथील मनपाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ अमृत महोत्सवात गोतिसे महाराजांनी गेल्या सहा दिवसांत भागवतकथेतील नऊ अध्यायाचे सुंदर व सोप्या शब्दात निरूपण केले. श्रीकृष्णाने गोकुळात केलेली बाललीलांचे वर्णन केले. सकटासूर, त्रुणावर आणि पुतना यांना मोक्षपर भगवंतांचे नामस्मरण, उखळाबरोबर कृष्णाने केलेली लिला, भगवंतांच्या मुखी माती पाहून माता यशोदेला झालेले विश्वरूप दर्शन, गोपाळ व गवळणीबरोबर भगवंताने खेळलेले खेळ, भगवंतांनी कल्याणवर्धक गोवर्धन करंगळीवर कसा उचलला याबद्दल गोतिसे महाराजांनी कथेचे महात्म्य सांगितले. कथेतील प्रारूप विषयानुसार जिवंत देखावाही सादर केल्याने भाविक, महिला नृत्य करत सहभागी झाले होते.
यावेळी स्वागताध्यक्ष बबनराव घोलप, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, रामनाथ महाराज शिलापूरकर, शशीकला घोलप, शंकरशेठ औशीकर, यशवंत भाबड, सुधाकर जाधव, वासुदेव गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील गाडेकर, त्र्यंबकराव गायकवाड, मुकुंद गायकवाड, मंगेश लांडगे, नीलेश खुळगे, अजय कडभाने, रूपाबाई ढोले आदिंसह भाविक उपस्थित होते.

Web Title: Heartburn should be ignited in the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.