हनुमंतराय जन्मोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:16 PM2019-04-23T21:16:02+5:302019-04-23T21:16:33+5:30

कोकणंगाव : श्री क्षेत्र कोकणंगाव येथे हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून संपुुर्ण गाव या सोहळ्यात दंग झाले आहे.

Hanumantrai Janmotsav Start | हनुमंतराय जन्मोत्सवास प्रारंभ

हनुमंतराय जन्मोत्सवास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे काल्याचे किर्तनाने जन्मोत्सवाची सांगता होणार

कोकणंगाव : श्री क्षेत्र कोकणंगाव येथे हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून संपुुर्ण गाव या सोहळ्यात दंग झाले आहे.
गरुवर्य नामदेव महाराज पठाडे व माधव महाराज घुले (इगतपुरी) यांच्या प्रेरणेने, यंदा हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवाच्या ४१ व्या सोहळ्यास शुक्रवार (दि १९) पासून सुरुवात झाली आहे. हो सोहळा गुरुवार (दि.२५) पर्यंत चालणार आहे.
या कार्यक्र मासाठी रोज पहाटे ४ वा. काकडा भजन, सकाळी ७ वा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ वा.गाथा भजन दुपारी ३ वा भागवत कथा, भजन सायंकाळी ६ वाजता सामुदायिक हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. तसेच पंचक्र ोशीतील भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने हजर रहातात. शुक्र वारी (दि. २६) एकनाथ महाराज गोळेसर (सिन्नर) यांचे सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तनाने जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.
(फोटो २३ कोकणगाव)

Web Title: Hanumantrai Janmotsav Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर