वातावरणात गारठा कायम; धुकेही दाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:05 AM2018-11-29T01:05:58+5:302018-11-29T01:06:41+5:30

शहराचा पारा अचानकपणे घसरला असून, वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी आणि धुकेही नाशिककरांनी अनुभवले.

 Hail in the environment; Fog | वातावरणात गारठा कायम; धुकेही दाटले

वातावरणात गारठा कायम; धुकेही दाटले

Next

नाशिक : शहराचा पारा अचानकपणे घसरला असून, वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी आणि धुकेही नाशिककरांनी अनुभवले. ११.३ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून मंगळवारी करण्यात आली होती. बुधवारी (दि.२८) ११.६ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. यामुळे नाशिककर गारठले आहेत.  आठवडाभरापासून थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. किमान तपमानाचा पारा रविवारी १३ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे संध्याकाळी व पहाटे हवेत गारवा निर्माण झाला होता. थंडीची तीव्रताही सोमवारी रात्रीपासून अचानकपणे वाढली.

Web Title:  Hail in the environment; Fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.