गुलवडी यांच्या वादनाने ‘तबला चिल्ला’चा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:36 AM2019-01-14T01:36:27+5:302019-01-14T01:36:51+5:30

तबलावादनातील ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी वादन प्रकारांनी रंगलेल्या ‘तबला चिल्ला’चा ओंकार गुलवडी यांच्या वादनाने समारोप झाला. तत्पूर्वी तबला चिल्लाच्या सकाळच्या सत्रात बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवाँ यांच्या पारंपरिक रचनांचे केलेले सादरीकरण रसिकांचे विशेष आकर्षण ठरले.

Gulwadi's announcement concludes with 'Tabla Shilla' | गुलवडी यांच्या वादनाने ‘तबला चिल्ला’चा समारोप

गुलवडी यांच्या वादनाने ‘तबला चिल्ला’चा समारोप

Next
ठळक मुद्देबापूसाहेब पटवर्धन यांचे वादन रंगले

नाशिक : तबलावादनातील ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी वादन प्रकारांनी रंगलेल्या ‘तबला चिल्ला’चा ओंकार गुलवडी यांच्या वादनाने समारोप झाला. तत्पूर्वी तबला चिल्लाच्या सकाळच्या सत्रात बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवाँ यांच्या पारंपरिक रचनांचे केलेले सादरीकरण रसिकांचे विशेष आकर्षण ठरले.
आदिताल तबला अकादमीतर्फे सुरू असलेल्या तबला चिल्लाच्या अखेरच्या दिवशी रविवारी (दि. १३) सायंकाळच्या सत्रात दिगंबर सोनवणे यांनी दिल्ली घराण्याची पेशकश करताना पेशकार रंग, पारंपरिक तुक डे, अनाघात बंदिशीचे सादरीकरण केले. तर आग्रा येथील डॉ. निलू शर्मा यांनी त्रितालातील पारंपरिक बंदिशींचे सादरीकरण केले. या सत्रात पंडित ओमकार गुलवडी यांनी त्यांच्या पारंपरिक रचनांचे सादरीकरण करताना उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात पंडित बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवॉँ यांच्या पारंपरिक रचनांचे केलेले सादरीकरण तबला चिल्लाच्या समारोपाच्या दिवसाचे आकर्षण ठरले.
त्यांच्यानंतर राम बोरगावकर व गणेश बोरगावकर यांनी एकत्रित बनारस घराण्याचे विविध वादनाचे प्रकार सादर केले. त्यांना रसिद कुलकर्णी, ज्ञानेश्वर सोनवणे, पुुष्कराज भागवत यांनी संवादिनीवर साथसंगत केली.यावेळी रसिक उपस्थित होते.

Web Title: Gulwadi's announcement concludes with 'Tabla Shilla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.