वाढोली ते खंबाळे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 03:59 PM2019-06-14T15:59:40+5:302019-06-14T16:00:07+5:30

त्र्यंबकेश्वर:नाशिक त्र्यंबकेश्वर या प्रमुख राज्य मार्गाजवळील वाढोली ते खंबाळे या मधल्या  वाढोली ते खंबाळे रस्त्याची दुरवस्था,अद्याप कामच केले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 Growth to the Khambale road | वाढोली ते खंबाळे रस्त्याची दुरवस्था

वाढोली ते खंबाळे रस्त्याची दुरवस्था

Next
ठळक मुद्देकुंभ मेळा काळात डांबरीकरण रस्ता करण्यात आला माञ दोन वर्षात रस्त्याची पावसाने वाट लागल्याने पुन्हा करोडो रु पये निधी खंबाळे वाढोली रस्त्यासाठी मंजुर झाला त्याचे टेंडर होऊन वर्ष उलटले असतांना काम पुर्ण न झाल्याने गावकर्यां मध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या स

 

त्र्यंबकेश्वर:नाशिक त्र्यंबकेश्वर या प्रमुख राज्य मार्गाजवळील वाढोली ते खंबाळे या मधल्या  वाढोली ते खंबाळे रस्त्याची दुरवस्था,अद्याप कामच केले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ठेकेदाराने चार मिहन्यापुर्वी केवळ रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या भिंती बांधण्यासाठी पाया भरण्याकामी केवळ खड्डे खोदुन ठेवले आहेत. त्यानंतर अद्याप कामच केले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वाढोली ते खंबाळे हा मधला मार्ग अत्यंत महत्वाचा अंतर कमी करण्याचा आहे. या मधल्या रस्त्याने वाढोली खंबाळे तळेगाव (अं) मिहरावणी बेलगाव ढगा वगैरे पुढे जाता येते. तथापि वाढोली ते खंबाळे हा रस्ता खाच खळग्याचा दगड गोटे पडलेला आहे. पावसाळ्यात डोंगरावरु न पडलेल्या पाण्यामुळे असलेला रस्ताही खचुन जातो. म्हणुनच रस्त्याच्या दोन्हीही बाजुला भिंतीचे बांधकाम धरले आहे.पण भिंतीसाठी खोदलेल्या खड्ड्यांचे कामही अर्धवट स्थितीत आहे. अशा अर्धवट काम सोडुन व वाढोली खंबाळे गावातील ग्रामस्थांची ऐन पावसाळ्यात गैरसोय करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची गावक-यांची मागणी जोर धरीत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या खंबाळे वाढोली रस्ता प्रत्येक पावसाळ्यात खचत असल्याने रस्त्याच्या कडेला भिंतींचे बांधकाम करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडा खोदुन सहा मिहने झाले आहेत. तर कामाची प्रगती शुन्य असल्याने गावक-यांना मोठ्या गैर सोयीचा सामना करावा लागतआहे.
खंबाळे वाढोली रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण करावे अशी मागणी गावकर्यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे केली होती. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाले नाही, तसेच अर्धवट स्थितीतील काम अद्यापही ठप्प आहे. गावातील रस्त्याचे कामही ठेकेदारांकडून पूर्ण करण्यात आले नाही.रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करण्यात आली आहे. येथे मुरु म टाकण्याचे कामही पुर्ण झाले नाही. काम सुरू होऊन तब्बल सहा मिहने झालीत, तरीही कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे रस्त्यात अपघाताचा आलेख वाढला आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडलाआहे. याठिकाणी ठेकेदाराने रिफ्लेक्टर तसेच सूचना फलक लावले नाहीत. परिणामी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा आलेख उंचावला आहे. रस्त्याचे काम तातडीने पुर्ण होण्याची गरज गावकर्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा तोंडावर आला असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजू बांधकाम करण्यासाठी खोदल्या असल्याने रस्ता पुर्ण पणे कमजोर करण्याचे संबधित ठेकेदारांने केले असल्याने यंदा पिहल्याच पावसात दोन ते तीन किमीचा रस्ता धुवुन जाण्याच्या मार्गावर असल्याने वेळेत काम पुर्ण न करणा-या संबधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहे.
 

Web Title:  Growth to the Khambale road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.