भूजल पातळी खालावली : २९ गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; महिलांची भटकंती येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:13 AM2018-04-27T00:13:25+5:302018-04-27T00:13:25+5:30

येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे.

Groundwater level lowered: 29 villages, water supply through tankers to two hamlets; Wasting of women severe water shortage in Yeola taluka | भूजल पातळी खालावली : २९ गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; महिलांची भटकंती येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

भूजल पातळी खालावली : २९ गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; महिलांची भटकंती येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी अडवा, पाणी जिरवा केवळ कागदावरखरी उन्हाची तीव्रता आणि चटके आता येवला तालुक्याच्या सर्वच भागास

येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मे महिन्यात तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भूजल पातळी आणखी खाली चालली असून, वर्षानुवर्षे पाणी टँकरचे तालुक्याला लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याने ग्रामस्थांना उन्हाळा असह्य होत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा केवळ कागदावर राहिले असल्याचे स्पष्ट होत आहे. नगरसूल परिसरात असलेल्या १९ वाड्या-वस्तींवरचे प्रस्ताव पंचायत समितीमधून प्रांत कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राण्यांची भटकंती
खरी उन्हाची तीव्रता आणि चटके आता येवला तालुक्याच्या सर्वच भागास बसत आहेत. माणसांना उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत, तर हरणे, मोरांसह वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. सर्वच तळी, नाले, डबके कोरडेठाक पडले असून, वृक्ष, गवत, वेलीही करपून गेल्याने जंगलातील हरणांचे कळप अन्न व मुख्यू म्हणजे पाण्यासाठी भटकत आहेत. यामुळे जंगलातील हरणे, मोर व वन्यप्राण्यांसाठी तयार केलेल्या ‘वॉटर होल’मध्ये टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु ही व्यवस्थादेखील अपुरी पडत आहे. वॉटर होलमधून वाड्यावर राहणारे लोक आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी हरणांच्या व वन्यप्राण्यांसाठीचे पाणीदेखील घेऊन जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Groundwater level lowered: 29 villages, water supply through tankers to two hamlets; Wasting of women severe water shortage in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी