हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:15 AM2018-06-02T01:15:07+5:302018-06-02T01:15:07+5:30

गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.

 Greetings to martyr farmers | हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन

हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन

Next

नाशिक : गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.  शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देऊनही महाराष्ट्र शासनाने ते पाळले नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभर आंदोलन उभे राहिले. यात शहीद झालेल्या शेतक-यांना अभिवादन करतानाच शेतमालाला हमी भाव द्यावा, दुधाला हमीभाव द्यावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत विधेयक मंजूर करून कायदेशीर मार्गाने शेतकºयांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एकीकडे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता मंचाने १ जूनपासून देशव्यापी संप पुकारला असला तरी नाशिक जिल्हा शेतकरी सुकाणू समितीने या संपात सहभागी न होता शेतकºयांच्या प्रश्नासाठी बलिदान देणाºया शेतकºयांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हुतात्मा स्मारकात झालेल्या या अभिवादन सभेप्रसंगी समिती सदस्य अमृता पवार, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, राजू दसले, समाधान भारतीय, प्रभाकर वायचळे, कैलास खांडबहाले, वैभव देशमुख, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील, योगेश कापसे, वैशाली डुंबरे, वैशाली पाटील, चारुशीला देशमुख, संपत जाधव, सोमनाथ बोराडे, डॉ. अनुपमा मराठे, अभय सूर्यवंशी आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.  सध्या खरिपाची तयारी सुरू असून, यंदा समाधानकारक पाउस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चांगले उत्पादन होऊन शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकºयांचे नुकसान होऊ नये याकरिता आम्ही संपात सहभागी झालेलो नाही. शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेत विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारने विशेष संसदीय अधिवेशन बोलवावे यासाठी आमचा कायद्याने लढा सुरूच राहणार आहे.  -हंसराज वडघुले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना
प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शेतकºयांच्या प्रश्नांवर लढा देत आहे. गेल्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. परंतु आता शेतक-यांच्या हमीभावासह इतर मुद्द्यांवर लोकसभेत विधेयक मांडून याविषयावर विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. त्यामुळे शेतक -यांना त्यांचे हक्क कायदेशीर मार्गाने मिळावेत यासाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचा लढा सुरूच राहील.
-अमृता पवार, जिल्हा परिषद सदस्य

Web Title:  Greetings to martyr farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी