गौरी पटांगणावरून गोवया गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:45 AM2018-02-25T00:45:06+5:302018-02-25T00:45:06+5:30

होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे.

Goa goes missing from Gauri Court | गौरी पटांगणावरून गोवया गायब

गौरी पटांगणावरून गोवया गायब

Next

पंचवटी : होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे.  पूर्वीपासून गौरी पटांगणावर गोवºया विक्र ी केल्या जात असल्याने या पटांगणाला गोवरी पटांगण असे नाव पडलेले होते. परंतु, त्याचा अपभ्रंश होत त्याला गौरी पटांगणच असे संंबोधिले जाते. दरवर्षी होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच पेठ, हरसूल, ठाणापाडा, आड, करंजाळी, दिंडोरी या आदिवासी खेड्या-पाड्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राणशेणी तसेच हाताने थापलेल्या गोवºया वक्र ीसाठी आणायचे. गौरी पटांगणात गोवºया विकत मिळत असल्याने नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते गोवºया खरेदीसाठी गर्दीही करायचे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून गौरी पटांगणात बसणारे गोवºया विक्रे ते गायब झाल्याचे दिसून येते. गेल्या आठवड्यात महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदाकाठचा पायी दौरा केल्यानंतर गौरी पटांगणात बसणाºया गोवºया विक्रे त्यांना हटविण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाने या गोवºया विक्रे त्यांना गौरी पटांगणात बसण्यास विरोध केल्याने गोवºया विक्रे ते गायब झाल्याचे बोलले जात आहे. होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच भरणाºया या गोवºया बाजारात विक्रे ते दिसत नसल्याने पटांगण ओस पडले आहे, तर आता होळीच्या सणाला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने गोवºया खरेदीसाठी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट खेडेगावची वाट धरावी लागत आहे. येत्या गुरुवारी (दि.१) होळीचा सण असल्याने गोवºया खरेदीसाठी कार्यकर्ते धावपळ करत आहेत. शहरात लाकडांची होळी करण्याऐवजी गोवºयांची होळी रचणारी अनेक मंडळी आहेत. परंतु, महापालिकेच्या धोरणामुळे गोवºया आणायच्या कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रोजगारांवर गंडांतर
गौरी पटांगणावर दरवर्षी होळीच्या पाच-सात दिवस अगोदर मोठ्या प्रमाणावर गोवºयांचा बाजार थाटलेला असतो. आसपासच्या आदिवासी भागातील नागरिक गेल्या तीन-चार महिन्यांत राबून गोवºया तयार करत असतात. त्यातून त्यांची चांगली कमाई होत असते. परंतु, आयुक्तांनी गौरी पटांगणावर गोवºया व वाळूविक्रेत्यांना हटविण्याचे आदेश दिल्याने गोरगरीब मजुरांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. सदर मजूर हे सात-आठ दिवसांपुरताच हा व्यवसाय करत असतात.

Web Title: Goa goes missing from Gauri Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.