दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:33 AM2018-10-24T00:33:40+5:302018-10-24T00:33:56+5:30

दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे.

 Garbage collection increase due to Diwali | दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ

दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ

Next

इंदिरानगर : दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे.  शहरातील घंटागाडीची कचरा उचलण्यासाठी क्षमता दोन ते अडीच टन असून, एका घंटागाडीने दोन फेºया मारल्या तर चार टन कचºयाची वाहतूक होते. प्रत्येक घंटागाडीने अतिरिक्त एक फेरी मारली तरी, प्रत्येक घंटागाडीमागे सुमारे एक टन कचरा वाढल्याचा अंदाज लावला जातो. त्यामुळे खत प्रकल्पावर कचरा वाढीमुळे खताच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे. दहा दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपल्याने घराघरात साफसफाई सुरू झाली असून, अडगळीतील नको असलेले सामान आणि भंगार टाकून दिले जाते. बरेचशा नागरिकांकडून हे भंगारदेखील घंटागाडीत टाकले जाते. त्यामुळे घंटागाडीत टाकण्यात येणाºया कचºयाच्या प्रमाणात वाढ झाली  आहे.  पंचवटी, नाशिकरोड, पश्चिम, पूर्व व सातपूर, सिडकोतून सुमारे दररोज १७० घंटागाड्या कचरा गोळा करतात त्या सर्व घंटागाड्या खत प्रकल्पावर हा कचरा टाकतात. दिवाळीपूर्वी म्हणजे सुमारे दोनशे चाळीस टन कचरा गोळा केला जात होता. आता मात्र प्रत्येक घंटागाडीमागे सुमारे एक ते दीड टन कचºयात वाढ झाली असून, दररोज सुमारे ५१० टन कचरा संकलित केला जात आहे. या कचºयापासून खत तयार केले जात असल्यामुळे खत निर्मितीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Web Title:  Garbage collection increase due to Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.