मोफत अंत्यसंस्कार योजना असताना अंत्यविधी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:07 AM2018-10-24T01:07:31+5:302018-10-24T01:07:56+5:30

शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला;

 Funeral Expenses While Free Funeral Planning | मोफत अंत्यसंस्कार योजना असताना अंत्यविधी महागले

मोफत अंत्यसंस्कार योजना असताना अंत्यविधी महागले

Next

नाशिक : शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला; परंतु महापालिकेने पुन्हा ठेकेदाराची नेमणूकच केली नसल्याने जुन्याच ठेकेदाराच्या नातलगांकडून येथे लाकडांची विक्री होत असून, एका अंत्यसंस्कारासाठी दोन ते अडीच हजार रुपयांना लाकूड विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याने येथील अमरधाममध्ये अंत्यविधी महागले आहेत.  महापालिकेकडून शहरात मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. या योजनेसाठी दरवर्षी ७५ लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांची तरतूद केली जाते. या तरतुदीतूनच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना, आप्तांना अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड देण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, हा ठेका संपुष्टात आणल्यानंतरही महापालिकेने गंगापूर अमरधामला लाकूड पुरवठा करण्यासाठी नव्याने निविदा काढली नाही. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधीच्या लाकडांसाठी जवळपास अडीच हजार रुपयांची मागणी होते.
अन्यथा लाकडांची व्यवस्था मृतांच्या नातलगांना करण्यास सांगण्यात येते. विशेष म्हणजे शहरातील पंचवटी
आणि नाशिक अमरधाममध्ये  लाकडांचा पुरवठा महापालिकेचे कंत्राटदारच करीत असताना गंगापूर भागातील नागरिकांना मात्र लाकडांचे पैसे मोजावे लागत आहे.  गंगापूर अमरधाममध्ये असलेल्या तीन दाहिन्यांपैकी एकच दाहिनी कार्यरत आहे. उर्वरित दोन दाहिन्यांचे बांधकाम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम किती कालावधीत पूर्ण होणार याकडेही कुणाचेही लक्ष नसल्याने अमरधाममध्ये सर्वत्र बांधकामाचे साहित्य पडलेले आहे. त्यामुळे जणू हे अमरधामच अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
 नागरिकांनी तक्रारी केल्या असतानाही पालिकेचे  अधिकारी मात्र दुर्लक्षच करीत आहेत. या अमरधाममध्ये गंगापूर गावासह शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, ध्रुवनगर, हनुमाननगर, बेंडकुळे मळा या भागातील
रहिवासी त्यांच्या आप्तांवर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी येतात.

Web Title:  Funeral Expenses While Free Funeral Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.