सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:09 AM2018-05-26T00:09:11+5:302018-05-26T00:09:11+5:30

अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया भाजीविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, अतिक्रमण करून व्यवसाय करणाया विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी विक्रेत्यांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

Front on CIDCO departmental office | सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा

सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा

Next

सिडको : अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यान्वित केलेले असताना काही भाजीपाला व्यावसायिक हे दिलेल्या जागेत व्यवसाय न करता दुसऱ्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. परिणामी मनपाने दिलेल्या ठिकाणी बसणाºया भाजीविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, अतिक्रमण करून व्यवसाय करणाया विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी विक्रेत्यांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. अंबड येथील दत्तनगर परिसरात महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा कार्यन्वित केली आहे. या ठिकाणी परिसरातील सुमारे ९० टक्के विक्रेते व्यवसाय करीत असून, यातील काही व्यावसायिक मात्र मनपाने दिलेल्या जागेत व्यवसाय करीत नसून अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहे. कारगील चौकात अतिक्रमण करून व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवर कारवाई करावी यासाठी शुक्रवारी साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या सिडको विभागीय कार्यालवार भाजीविक्रेत्यांनी मोर्चा काढत अतिक्रमण करून व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनपाकडे केली.  मनपाने भाजीविके्रत्यांसाठी स्वतंत्र जागा दिलेली असतानाही जे व्यावसायिक अतिक्रमण करून व्यवसाय करीत असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, संबंधित विक्रेत्यांवर मनपाने त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. यावेळी साहेबराव दातीर याच्यासह भाजीपाला विक्रेते लता गायधनी, उषा दोंदे, वैशाली धात्रक, भीमा गुळवे, सारिका गुळवे, शोभा काकड, प्रमिला प्रजापती, सुमन भालेराव, ममता महाजन, मंगला पाटील आदींसह शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते.
मनपाच्या वतीने अंबड येथील दत्तनगर भागात अधिकृत भाजी विक्रेत्यांसाठी फेरीवाला क्षेत्र कार्यन्वित केलेले असल्याने या ठिकाणी भाजीविक्रेते व्यवसाय करीत आहेत. परंतु यातील काही भाजीविक्रेते हे मनपाने ठरवून दिलेल्या जागेत व्यावसाय न करता रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असल्याने फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. संबंधित भाजीविक्रेत्यांवर मनपाने कारवाई करावी.
- साहेबराव दातीर, अंबड

Web Title: Front on CIDCO departmental office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.