दातली शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:11 PM2018-09-12T17:11:11+5:302018-09-12T17:13:01+5:30

सिन्नर  तालुक्यातील दातली शिवारात बिबट्या मादीने बछड्यांसह दर्शन दिल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. संभाव्य दुर्घटना घडण्याआधी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Free communication of leopards in the Datoli Shiva | दातली शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

दातली शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

googlenewsNext

बिबट्याच्या मुक्त संचाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. सोमवारी पहाटे कुत्रे भुंकण्याचा आवाजाने जागे झालेल्या दत्तू दराडे यांना बिबट्या दिसून आला. गेल्या चार-पाच मादी व बछड्याने दर्शन दिल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दातली शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Free communication of leopards in the Datoli Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.