खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:07 AM2019-02-26T01:07:58+5:302019-02-26T01:08:17+5:30

आडगाव शिवारात ट्रान्सपोर्ट चालकाकडे ट्रान्सपोर्ट गाड्या सांगण्याप्रमाणे भरण्यासाठी दर महिन्याला अकरा हजार रु पयांची खंडणी मागणाऱ्या तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास वाहने पेटविण्याची धमकी देणाºया चार संशयित आरोपींना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

The four persons who demanded the ransom were arrested | खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

Next

पंचवटी : आडगाव शिवारात ट्रान्सपोर्ट चालकाकडे ट्रान्सपोर्ट गाड्या सांगण्याप्रमाणे भरण्यासाठी दर महिन्याला अकरा हजार रु पयांची खंडणी मागणाऱ्या तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास वाहने पेटविण्याची धमकी देणाºया चार संशयित आरोपींना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. मारहाण करून खंडणी मागणाºया संशयित आरोपीविरुद्ध ट्रान्सपोर्ट चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत इंदिरानगर येथील शांतीपार्क सोसायटीत राहणाºया अरुणकुमार धर्मराज यादव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. रविवारी (दि.२४) दुपारच्या वेळी संशयित आरोपी स्वप्नील वामनराव पांगरे (जुने सिडको), नितीन उत्तम तिडके, अश्विन राजेंद्र जामदार (तिडकेनगर, उंटवाडी), हिरामण बाहु विधाते आदींनी यादव यांच्या आडगाव शिवारातील न्यू साईबाबा रोडलाईन्स येथे येऊन ‘आमच्या सांगण्याप्रमाणे गाड्या भरा अन्यथा दर महिन्याला ११ हजार रु पये द्या’ असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बिडकर तपास करीत आहेत.
संशयितांविरुद्ध गुन्हा
घटनेनंतर यादव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

Web Title: The four persons who demanded the ransom were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.