पावले चालती पंढरीची वाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:23 AM2018-07-23T00:23:10+5:302018-07-23T00:23:27+5:30

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २१) शहरातील विविध शाळांमधून मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत दिंडी काढली. यावेळी पाऊले चालती पंढरीची वाट, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशी भजने गात चिमुकल्यानी सहभाग घेतला.

Footsteps | पावले चालती पंढरीची वाट....

पावले चालती पंढरीची वाट....

googlenewsNext

नाशिक : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २१) शहरातील विविध शाळांमधून मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत दिंडी काढली. यावेळी पाऊले चालती पंढरीची वाट, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशी भजने गात चिमुकल्यानी सहभाग घेतला.  हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित, शिशुविहार व बालक मंदिर इंग्रजी विभागामध्ये आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. जय विठ्ठल-विठ्ठल अशा नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी मुलांनी आषाढी एकादशीची माहिती दिली. ओव्या, अभंग, भजन याचे गायनही केले. विद्यार्थ्यांच्या रिंगणाने सर्वांचे लक्ष वेधले. जया उगळे, राखी दुबे, रिमा जोशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. मुख्याध्यापक साक्षी भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्र मास सुनीता शिंदे, सपना थेटे सहकार्य लाभले.
पंचवटीत वृक्षदिंडी
पंचवटी येथील गोसावी बहुद्देशीय संस्था व श्रीराम प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वारकरी वेशभूषा केल्या होत्या.
जीबीएस संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गोसावी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, तुषार धुमाळ, प्रतिभा वाघ, श्रीराम शाळेचे मुख्याध्यापक प्रतिभा सोनजे, सुनील सोनार, गंगाधर बहिरम, चंद्रकांत डोंगरे, अविनाश वाघ, सुभाष जगदाळे, खंडेराव डावरे, मनोज राठोड, उषा चोधरी, आशा क्षीरसागर, सरला पाटील, सीमा वाघ, मालती जाधव आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यालयात वृक्षदिंडी : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रारंभी ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे व पालखीचे मुख्याध्यापक खर्देकर तसेच संस्थेचे सहसचिव वेळीस यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकºयाची वेशभूषा करत विविध अभंग गात विजयनगर परिसरातून भगवे झेंडे, तसेच संदेश पाट्या घेऊन प्रभातफेरी, वृक्षदिंडी काढली. तसेच झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी दिला़ त्यानंतर सर्व मुलींनी मध्यभागी फुगडी खेळली़ कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापक खर्देकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.
जेडीसी बिटको स्कूल
जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये हरित सेना इको क्लब व इअर विंग एनसीसीच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजीव दातरंगे होते. सूत्रसंचालन हरित सेनेची लीडर साक्षी नरवडे व राणी नेलगे यांनी केले. यावेळी रोहिणी बटवाल, इअर एनसीसीचे एएनओ संभाजी मुन्तोडे, एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते.
रंगूबाई जुन्नरे हायस्कूल
रंगूबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देत पर्यावरण रॅली काढली होती. प्रभारी मुख्याध्यापिका सारिका पाटील यांनी आषाढी एकादशीची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी व वारकºयांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

Web Title: Footsteps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.