मोसम खोऱ्यातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:15 AM2018-03-27T00:15:30+5:302018-03-27T00:15:30+5:30

निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे खेड्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

Fleet Road in the Season Valley | मोसम खोऱ्यातील रस्त्यांची चाळण

मोसम खोऱ्यातील रस्त्यांची चाळण

Next

शरद भामरे।
स्थळ : मुळाणे-कौतिकपाडा रस्ता. वेळ : सकाळी १० वा.
औंदाणे : निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे खेड्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मुळाणे ते कौतिकपाडा सुमारे तीन किलोमीटर रस्त्यावरील डांबर उखडले आहे. खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहेत व दुतर्फा काटेरी बाभळांनी वेढा घातल्याने साइडपट्ट्या नामशेष झाल्या आहेत. शेतकºयांनी रस्त्यालगत पिके घेतल्याने रस्ता छोटा होऊन रस्ता की पांधी अशी अवस्था आहे. तादुंळवाडी ते नांदीनकडे जाणाºया तीन कि.मी. रस्त्याचे हाल झाले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण नाही की निधीही मंजूर नाही. कच्चा रस्ता असल्याने खडी पूर्णत: उघडी पडली आहे. नांदीन ते पिसोळ किल्ला हा सुमारे दोन कि.मी. रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. खडी उघडी पडली आहे. हा रस्त्यावर पुरातन पिसोळ किल्ला असून, पर्यटकांची येथे वर्दळ असते. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.   तालुक्यातील काही भागात दोन-दोन, तीन-तीन कि.मी. अंतराचे रस्ते झाले आहेत. मात्र निकृष्ट दर्जामुळे दोनच वर्षांत डांबर उघडून रस्त्याची दुरवस्था झाली. उर्वरित रस्त्यांना निधी उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने हे रस्ते जैसे थे आहेत. हे सर्वच रस्ते वर्दळीचे आहेत. स्थानिक नागरिक व शेतकरी याच मार्गांवरून सटाणा व कळवण येथे शेतमाल नेतात. मात्र रस्ते ठिकठिकाणी उखडल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.  रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांनी अतिक्रमण केले आहे.त्यामुळे साइडपट्ट्या नामशेष झाल्या आहेत. झुडपांच्या अतिक्रमणामुळे वळणावर वाहने एकमेकांना न दिसल्यामुळे लहान -मोठे अपघात घडत आहेत. खराब रस्त्यामुळे शेतकरी वर्गाला आपला माल वेळेवर बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र या सर्व गोष्टींचा सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीवर कुठलाही परिणाम होत नाही. या रस्त्यांवरु न पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय नसल्याने हे पाणी साचून ठिकठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे वाहनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता उखडून खडी वर आल्याने वाहने घसरणे, पंक्चर होणे, वाहनांचे पाटे तुटणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. लोकांना मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.
वाहनधारकांचे हाल
जुनी शेमळी ते अजमीर सौंदाणे हा तीन किमी रस्ता छोट्या मोठ्या डोंगर पायथ्यापासून गेला आहे. या रस्त्याला निधी नसून लोकप्रति निधीही कधी ही इकडे फिरकले नसल्याने वाहनधारकांना खडी तुडवत धूळ अंगावर झेलत मार्गक्रमण करावे लागते. आदिवासी भागातील दूरवर मोरकुरे ते पठावे या चार किलोमीटर रस्त्याचे डांबर वर्षात उघडून गेले आहे. खडी उघडी पडल्याने वाहने पंक्चर होत आहेत. खड्ड्यांच्या प्रमाण वाढ झाली आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे वाहने नादुरुस्त होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. चालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Fleet Road in the Season Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.