दोघा बाजार समित्यांची अंतिम यादी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:04 AM2018-03-15T01:04:00+5:302018-03-15T01:04:00+5:30

नाशिक : जिल्ह्णातील नामपूर व सटाणा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी, बाजार समिती कायद्यानुसार १० गुंठे जमीन ताब्यात असलेल्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

The final list of two market committees is postponed | दोघा बाजार समित्यांची अंतिम यादी लांबणीवर

दोघा बाजार समित्यांची अंतिम यादी लांबणीवर

Next
ठळक मुद्दे खातेदारांचा युद्धपातळीवर शोध दहा दिवस मुदतवाढ

नाशिक : जिल्ह्णातील नामपूर व सटाणा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी, बाजार समिती कायद्यानुसार १० गुंठे जमीन ताब्यात असलेल्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारने सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन कायदा तयार केला असून, त्यानुसारच आगामी निवडणुका होणार आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या सटाणा व नामपूर या दोन बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याच्या दृष्टीने शासनाने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास व दहा गुंठ्याहून अधिक जागा ताब्यात असलेल्यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. परंतु अनेक शेतकºयांच्या सातबारा उताºयावर सामायिक नावे असल्यामुळे नेमका मतदार कोण, असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित झाल्याने व त्याबाबत सहकार आयुक्तांनी समाधानकारक मार्गदर्शन न केल्याने बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी आहे त्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली. मात्र या यादीवर हरकतींचा पाऊस पडल्याने जिल्हाधिकाºयांनी सातबारा उताºयावरील क्षेत्र व त्यावर असलेल्या नावांच्या आधारे दहा गुंठे जमीन ज्याच्या ताब्यात असेल त्याला मतदार म्हणून नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक सातबारा उतारा तपासण्याचे काम महसूल खात्याने हाती घेतले आहे.
सदरचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी, खातेदारांची संख्या व सातबारा उताºयावरील सामायिक नावांची संख्या पाहता त्यांची दहा गुंठ्यात विभागणी करणे तांत्रिकदृष्ट्या अवघड झाले आहे. परिणामी १३ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही. २६ मार्च रोजी अंतिम मतदार यादीमतदार यादीचे काम करणाºया सहकार खात्याच्या अधिकाºयांनी विनंती केल्याने त्यांना आता दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, महसूल खात्याच्या कर्मचाºयांच्या माध्यमातून खातेदारांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे साधारणत: २६ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The final list of two market committees is postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.