गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:17 AM2018-05-24T00:17:37+5:302018-05-24T00:17:37+5:30

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या शिक्षण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच पालकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.

 Felicity ceremony of meritorious students; Glory of Honor | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; मान्यवरांचा गौरव

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; मान्यवरांचा गौरव

Next

इंदिरानगर : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या शिक्षण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच पालकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने कापडी पिशव्यांचेही यावेळी वाटप करण्यात आले.  व्यासपीठावर शल्यचिकित्सक डॉ. सुधीर कुलकर्णी, कवी संतोष हुदलीकर, इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, इंदिरानगर विभाग अध्यक्ष व कार्यक्र माच्या संयोजक राजश्री शौचे, संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष कुमार मुंगी, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, राजन कुलकर्णी, प्रा लक्ष्मीकांत भट, रवींद्र पैठणे, अवधूत कुलकर्णी, प्रमोद मुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर मान्यवरांच्या हस्ते महर्षी याज्ञवलक्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मीरा धारणे यांनी स्वरचित स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.  सूत्रसंचालन ओमकार शौचे यांनी केले. उदय जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास साधना जोशी, प्रेरणा जोशी, उपेंद्र शुक्ल, विनायक पुरोहित, अपर्णा गोहे, प्रिया लावर, रवींद्र भसे, प्रेरणा जोशी, साधना जोशी, सुनीता शुक्ल, उदय जोशी, सी. व्ही. महाजन, दिनेश जोशी, शरद दीक्षित, योगिनी चंद्रात्रे, भरत कुलकर्णी, अनंत काजळे, आत्माराम कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, प्रमोद मुळे, सुहास लेंभे, संजय केळकर, गजानन जाधव, शांता जाधव उपस्थित होते.
पुरस्कारार्थींचा गौरव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्याहाळदे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा. यावेळी बालवाडी ते नववीपर्यंत अभ्यासात व विशेष प्रावीण्य मिळविलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच विशेष कार्य करणाºया छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रद्धा नालमवार, नारायण न्याहाळदे, महिला पुरोहित स्मिता आपटे, खतनिर्मिती उद्योजक अमित बुडूक, प्राणिमित्र गौरव क्षत्रिय, महारांगोळीकार वीणा गायधनी, आसावरी धर्माधिकारी, ढोलवादक रोहित गायधनी, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे विनायक पुरोहित, राजसारथीचे अध्यक्ष चंद्रकांत बेलगावकर व अश्विनी कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title:  Felicity ceremony of meritorious students; Glory of Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक