नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:41 PM2018-01-04T15:41:06+5:302018-01-04T15:41:19+5:30

नांदगांव- नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ दिला. याबाबत तक्र ारीनंतरही चौकशी होत नाही याची अधिकाºयांनी दखल घ्यावी म्हणून तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी नरहरी थेटे यांनी या संदर्भातले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

Farmer's benefit to non-beneficial beneficiaries by putting rules on the ground | नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ

नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ

googlenewsNext

नांदगांव- नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ दिला. याबाबत तक्र ारीनंतरही चौकशी होत नाही याची अधिकाºयांनी दखल घ्यावी म्हणून तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी नरहरी थेटे यांनी या संदर्भातले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्यातील आशय असा की, कृषी विभागाने ज्यांना शेत तळ्याचा लाभ दिला. त्यांना सन २०१० व २०११ या वर्षेत ही लाभ दिला. एम आर ई जी एस या योजनेत सदर शेतकºयांना लाभ दिला आहे. ही दोन्ही शेततळी वेगवेगळ्या भागात असली तरी सदर कुटुंब हे एकित्रत असून त्यांचे रेशन कार्ड एक आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाला या एकाच योजनेचा दोन वेळा लाभ देता येतो का.?,त्याच बरोबर हे शेत तळे सद्यस्थितीत अस्तित्वात असल्या बाबत त्याचे छायाचित्र मिळावे, अशी थेटे यांची मागणी आहे. दुसºया एका शेतकºयाचे सामुदायिक शेत तळ्यामध्ये नाव असताना त्यांना ही २०१७ मध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेतून लाभ देण्यात आला व ५० हजार रु पये ही अदा करण्यात आले आहे.व प्लास्टिक (काळ्या कागदाचा) ही लाभ दिल्याचे थेटे यांचा लेखी आरोप आहे सन .२०१७ मध्ये झालेल्या शेत तळ्यांना जून २०१७ मध्ये लगेच प्लास्टिक चा लाभ देण्यात आल्याचे स्पष्ट करून,असा लाभ देता येतो का असा प्रश्न या निवेदनात उपस्थित केला आहे. तसेच २०१५-१६ मध्ये केशरबाई थेटे या महिला शेतकर्याच्या शेतात केलेल्या शेत तळ्याच्या बदल्यात एका अधिकार्याने पैशाची मागणी केली होती,मात्र ते न दिल्याने सदर शेतकर्याचे १५ हजार रु पये अनुदान रोखून धरले आहे,आसा ही आरोप करण्यात आला आहे. थेटे यांना कांदा चाळ उभारणी साठी पूर्वसंमती दिल्यानंतर ही त्यांची चाळ का रोखून धरण्यात आली आहे.असा सवाल करत जल शिवार योजनेत ही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थेटे यांनी शेवटी निवेदनात केला आहे व १५ जानेवारी पासून उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Farmer's benefit to non-beneficial beneficiaries by putting rules on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक