कळवणला कांदा दरात झाली घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:46 AM2019-06-14T00:46:54+5:302019-06-14T00:48:05+5:30

देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा निर्णय झाल्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी आहे.

Falling at Onion Rate | कळवणला कांदा दरात झाली घसरण

कळवणला कांदा दरात झाली घसरण

Next
ठळक मुद्दे१८ हजार क्विंटलची आवक : प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी

कळवण : देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा निर्णय झाल्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी आहे.
सोमवारी कळवण बाजार समितीत १८ हजार ७९५ क्विंटलची आवक होऊन सरासरी १३७५ रुपये भाव मिळाला. मंगळवारी कळवण बाजार समितीत १७ हजार ४०० क्विंटलची आवक होऊन सरासरी १३०० रुपये भाव मिळाला. बुधवारी आठवडे बाजार असल्याने
कळवणला लिलाव बंद होते; मात्र अभोणा येथे ७७१२ क्विंटल कांद्याची आवक होऊन १२०० रुपये भाव मिळाला होता.
गुरु वारी कळवण बाजार समितीत कांद्याची १५ हजार ५०० क्विंटलची आवक होऊन सरासरी १३०० रु पये भाव मिळाला असल्याची माहिती सचिव रवींद्र हिरे यांनी दिली.
देशात गरजेपेक्षा जादा कांदा उत्पादित होत असल्याने दरात कमालीची घसरण होत आहे. दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीला चालना देण्याचे धोरण आखले. त्या अंतर्गत कांदा निर्यातीस १० टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जाहीर झालेल्या या योजनेची मुदत ३० जूनपर्यंत होती. मंगळवारी ती अकस्मात गुंडाळण्यात आली. याचा परिणाम कांदा निर्यातीवर होईल. पर्यायाने कांदा दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने ही योजना पूर्ववत सुरू ठेवून तिला दीर्घकाळासाठी मुदतवाढ देण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Falling at Onion Rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.