आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:16 AM2019-04-26T01:16:56+5:302019-04-26T01:17:11+5:30

आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.

 Extension for RTE admission | आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

Next

नाशिक : आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील एकूण जागांपैकी २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी ५ ते ३० मार्च दरम्यान आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. नर्सरी आणि पहिल्या वर्गासाठी जिल्हाभरातून उपलब्ध जागांच्या तीन पट म्हणजे १४ हजार ५५३ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी राज्यासाठी पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यात नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ मुलांची निवड झाली असून, त्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत नाव असलेल्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, पहिल्या यादीत काही पालकांनी खोटे अंतर व खोटा पत्ता नमूद केल्याचा आरोप या यादीतून वंचित राहिलेल्या पालकांनी केला आहे.

Web Title:  Extension for RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.