देवळाली कॅम्प परिसरातील शाळांचा उत्कृष्ट निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:36 AM2018-06-02T00:36:13+5:302018-06-02T00:36:13+5:30

देवळाली कॅम्प परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयातील १२वीचा निकाल लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील आश्विनी पोरजे हिने ८६.४६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली आहे, तर द्वितीय-विज्ञान शाखेची राजश्री पाळदे ही ८६.१५ टक्के व कला शाखेतील प्रणिल भालेराव याने ८४.४६ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.

 Excellent results of schools in Devlali Camp area | देवळाली कॅम्प परिसरातील शाळांचा उत्कृष्ट निकाल

देवळाली कॅम्प परिसरातील शाळांचा उत्कृष्ट निकाल

googlenewsNext

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयातील १२वीचा निकाल लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.  श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील आश्विनी पोरजे हिने ८६.४६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली आहे, तर द्वितीय-विज्ञान शाखेची राजश्री पाळदे ही ८६.१५ टक्के व कला शाखेतील प्रणिल भालेराव याने ८४.४६ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.  विज्ञान शाखेचा निकाल ९९.८५ टक्के लागला आहे. प्रथम-राजश्री पाळदे (८६.१५ टक्के), द्वितीय- प्रणिल भालेराव (८४.४६), तृतीय- हर्षदा गोडसे (८३.५३) टक्के गुण मिळविले आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ७६.२३ टक्के लागला असून प्रथम - अश्विनी पोरजे ८६.४६ टक्के, द्वितीय- मानसी पाळदे- ८३.३८ टक्के गुण, तृतीय- गायत्री बरकले ८३.३० टक्के गुण मिळविले आहे. कला शाखेचा निकाल ५६.५९ टक्के इतका लागला असून प्रथम- प्रियंका गवळी ७८.१५ टक्के, द्वितीय- तेजस बरकले ७४ टक्के, तृतीय - श्रुती निसाळ ७३.६९ टक्के गुण मिळविले आहे. किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ज्योत्सना निंबेकर हिने ६४.४६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
डॉ. सुभाष गुजर हायस्कूल
डॉ. सुभाष गुजर हायस्कूलच्या हिंदी मिडियम व कनिष्ट महाविद्यालय वाणिज्य शाखेचा ९४.१८ व विज्ञान शाखेचा ९७.६७ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेत प्रथम- मयूर प्रकाशलाल खत्री, शेख सिमा रझवी ८४.३० टक्के, द्वितीय उचित विजय अहुजा ८९.०७ टक्के, तृतीय वैष्णवी व्यंकट गोडे ७८.८६ टक्के गुण मिळविले आहे. विज्ञान शाखेत प्रथम-करिष्मा अमर चावला ७८.३८ टक्के, द्वितीय-ङ्क्तफरिफा नदिम शेख ७७.५३ टक्के, तृतीय- रिया सुरेश मगणानी ७४.६१ टक्के गुण मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुंदरसिंग नरसिंघानी, घनश्याम केवलानी, नवीन गुरनानी, अनिल ग्यानचंदानी, रतन चावला, विनोद चावला, हसानंद निहालानी, मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
काकासाहेब देवधर शाळेचा  ९७ टक्के निकाल
दिंडोरीरोड येथील पूर्ण विद्यार्थीगृहाच्या देवधर शाळेचा बारीवाचा निकाल ९७ टक्के लागला. यात विज्ञान शाखेचा ९८.६१ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९६.२१ टक्के लागला. विज्ञान शाखेत धमेश देवरे याने ८१.०५ टक्के गुण मिळवून प्रथम, अथर्व पवार याने ७७.४५ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर स्पंदन पांडे याने ७६.६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेत श्रृती जैन हिने ८४.९ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, संतोष पंडित याने ७७.५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर साक्षी पटेल हिने ७७.७ टक्के गुण संपादित करून तृतीय क्रमांक मिळविला. संस्थेचे संचालक गुंजाळ, भारती पाटील, शर्मिला कु-हे, सोनाली चंद्रात्रे आदींचे मार्गदर्शन लाभले.
एकलहरे विद्यालयाचा १०० टक्के निकाल
एकलहरे येथील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १२वीचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के व कलाशाखेचा निकाल ९० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत प्रथम- मोहिनी पोपट कर्डिले (७७.५३), द्वितीय-अश्विनी राजेश नाठे (७६.७२), तृतीय-रिया बाळासाहेब सोनवणे (७२.९२) टक्के गुण मिळविले आहे, तर कला शाखेत प्रथम-माधुरी प्रकाश जगताप (७३ टक्के), द्वितीय-आकाश बाळू साळवे (६७ टक्के), तृतीय- अश्विनी भगवान पवार (६६ टक्के) गुण मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्य रमेश अलगट, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
गोसावी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल
डॉ. एम. एस. गोसावी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला, तर वाणिज्य शाखेचा ९३ टक्के लागला. विज्ञान शाखेत अनिरुद्ध मोरांकर ८७.८ टक्के गुण मिळवून प्रथम, तर निनाद एकबोटे हा ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय आला. सोहम खारकर ८५.२३ टक्के गुण मिळवून तृतीय आला. वाणिज्य शाखेत अवनित कौरसिंग गोरख (८२ टक्के) प्रथम, तर वैष्णवी काकोडकर (७७ टक्के) द्वितीय पटकाविला. त्यांना प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य एस. आर. वर्मा, जे. ए. शेख, ए. डी. पवार, प्रा. मानवेंद्र बोºहाडे, प्रा. ज्ञानेश्वर रिकामे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Excellent results of schools in Devlali Camp area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.