संकरित आणि शेतकी जनावरांच्या  प्रदर्शनासाठी वाढीव निधीची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:23 AM2018-02-24T00:23:41+5:302018-02-24T00:23:41+5:30

ग्रामपालिका आयोजित ४८व्या डांगी, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाला आज घोटी शहरात दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल झाले असून, यामुळे घोटी शहरात जनावरांचा जणू मेळा भरला असल्याचे दिसून येते.

Enhanced funding for hybrid and animal husbandry exposure | संकरित आणि शेतकी जनावरांच्या  प्रदर्शनासाठी वाढीव निधीची ग्वाही

संकरित आणि शेतकी जनावरांच्या  प्रदर्शनासाठी वाढीव निधीची ग्वाही

Next

घोटी : ग्रामपालिका आयोजित ४८व्या डांगी, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाला आज घोटी शहरात दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल झाले असून, यामुळे घोटी शहरात जनावरांचा जणू मेळा भरला असल्याचे दिसून येते. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार निर्मला गावित होत्या.  घोटीतील स्व.मूळचंदभाई गोठी उद्यानाजवळील पटांगणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांगळे यांनी स्पष्ट केले की, घोटीतील जनावरांचे प्रदर्शन हे पशुपालकांसाठी एक पर्वणी असून, या प्रदर्शनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन वाढीव निधी देण्यासाठी पुढाकार घेईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, कावजी ठाकरे, हरिदास लोहकरे, कल्पना हिंदोळे, रत्नाकर चुंबळे, पंचायत समिती सदस्य विमल तोकडे, विमल गाढवे, विठ्ठल लंगडे, मच्छिंद्र पवार, सोमनाथ जोशी, हौसाबाई करवंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. चांदुरे, गटविकास अधिकारी किरण जाधव, संपतराव काळे, रघुनाथ तोकडे, कुलदीप चौधरी आदी उपस्थित होते. घोटी ग्रामपंचायत डांगी जनावरांचे प्रदर्शनामुळे पशुधन टिकून असल्याचे आमदार निर्मला गावित यांनी नमूद केले. तालुक्यासह लगतच्या अकोले, त्र्यंबकेश्वर, खोडाळा, सिन्नर, शहापूर आदी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी-विक्रीसाठी दाखल झाली आहेत. प्रदर्शन यशस्वीतेसाठी सरपंच कोंड्याबाई बोटे, उपसरपंच आशाबाई जाधव, संतोष दगडे, रामदास शेलार, समाधान जाधव, मदन रुपवते, बाळासाहेब झोले, कैलास लोटे, मंगला आरोटे, मीराबाई आंबेकर, इंदुमती अस्वले, मीना झोले यांच्यासह ग्रामविकास अधिकारी उत्तम शेट्ये व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

Web Title: Enhanced funding for hybrid and animal husbandry exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.