पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:29 PM2019-06-16T23:29:20+5:302019-06-17T00:05:46+5:30

गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथावरील अतिक्र मणाकडे कानाडोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 The encroachment on the pavement of Panchavati is maintained | पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

Next

पंचवटी : गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथावरील अतिक्र मणाकडे कानाडोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजीबाजारात बसणाºया विक्रेत्यांना प्रतिबंध तर पदपथावरच्या हातगाड्यांना सूट असा काहीसा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून पंचवटीत सुरू असल्याने महापालिकेच्या अजब न्यायामुळे नागरिकदेखील काहीसे संभ्रमात पडले आहेत. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने पादचाऱ्यांसाठी केलेल्या पदपथावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र अनेक वर्षांपासून बघायला मिळते. रस्त्याला लागून तयार केलेले पदपथ ये-जा करणाºया पादचाºयांसाठी खुले ठेवावे, अशी मागणी प्रभाग बैठकीत लोकप्रतिनिधींकडून केली जात असते मात्र याकडे अतिक्र मण विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करते. याशिवाय गंगाघाटावर असलेल्या भाजीबाजार प्रवेशद्वाराजवळ काही बोटावर मोजण्याइतके भाजीविक्रे ते बसलेले असतात त्यांच्यावर वचक बसावा म्हणून मनपा अतिक्रमण विभागाचे पथक चारचाकी वाहनासह दैनंदिन सकाळपासून दाखल झाल्याचे दिसून येते.
एकीकडे अतिक्र मण करणाºयांविरुद्ध कारवाई करायची तर दुसरीकडे पदपथावर अतिक्र मण करणाºयांकडे दुर्लक्ष करायचे असाच न्याय पालिका प्रशासन देत असल्याने कारवाई सूडबुद्धीने की अन्य कारणाने या प्रशासनाच्या अजब कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. निमाणी बसस्थानकाबाहेर, पंचवटी कारंजा याशिवाय मुख्य रस्त्यालगत महापालिका प्रशासनाने रस्त्याने ये-जा करणाºया पादसाºयांसाठी पदपथ तयार केले आहेत. या पदावर दिवसभर फळविक्रेते, अन्य व्यावसायिक हातगाड्या उभ्या करतात त्यामुळे महापालिकेने हातगाडीधारकांसाठी की पादचारी वर्गासाठी पदपथ तयार केले? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
उघडपणे वसुली ?
पदपथावर उभ्या राहणाºया काही परप्रांतीय खाद्य विक्रेत्यांकडून जागेचा वापर म्हणून खासगीत दैनंदिन शंभर ते दोनशे रु पयांची वसुली केली जाते. जागा महापालिकेच्या मालकीची असली तरी उघडपणे खासगीत वसुली केली जात असल्याने गोळा केली जाणारी रक्कम कोणाच्या आदेशाने मनपाच्या तिजोरीत की स्वत:च्या फायद्यासाठी याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

Web Title:  The encroachment on the pavement of Panchavati is maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.