नाशिकरोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:28 AM2018-03-27T00:28:26+5:302018-03-27T00:28:26+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने नाशिकरोड विभागात अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी चार प्रकरणांतील दहा अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला.

Encroachment eradication campaign in Nashik Road | नाशिकरोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम

नाशिकरोडला अतिक्रमण निर्मूलन मोहीम

Next

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने नाशिकरोड विभागात अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी चार प्रकरणांतील दहा अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. पथकाने देवळाली शिवारातील कैलासपती अपार्टमेंटमधील जी. के. सिरॅमिक प्लम्बिंग यांचे सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामापैकी शेडचे बांधकाम संबंधितांनी स्वत:हून काढून घेतले तर भिंतीचे बांधकाम मनपाने हटविले. कैलासजी सोसायटीतील समुद्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट यांचा जाहिरात फलक हटविण्यात आला. खोले मळा, आर्टिलरी सेंटर रोड, येथील सुनील लक्ष्मण जाचक यांचे लोखंडी अँगल व वीट, सीमेंटमधील सर्व्हिस स्टेशनचे अन धिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. याशिवाय पाटील कॉम्प्लेक्स, जयभवानीरोड, गवळी यांचे लोखंडी अँगल वापरून केलेले शेडचे अनधिकृत बांधकाम, अजय देसाई यांचे गाळ्यासमोरील बांधकाम, पी. आर. चौधरी यांचे शेडचे बांधकाम, तुळसाई कॉस्मेटीकची पत्र्याची टपरी आदी बांधकामे हटविण्यात आली. सदर कारवाई अतिक्र मण निर्मूलन विभागाची दोन पथके, एक जे.सी.बी. व पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

Web Title: Encroachment eradication campaign in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.