एकलहरेत फेसाळली गोदावरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:01 AM2019-01-30T01:01:16+5:302019-01-30T01:01:32+5:30

एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.

 Ekalatat Fasalali Godavari | एकलहरेत फेसाळली गोदावरी

एकलहरेत फेसाळली गोदावरी

Next

एकलहरे : एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.  एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला असून, त्याच्या आजूबाजूला एकलहरे, शिलापूर, ओढा या गावांचा परिसर आहे. टाकळी येथील मनपाच्या मलशुद्धीकरण केंद्रातून नदीपात्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने ते फेसाळलेले पाणी नदीपात्रातून एकलहरे बंधाºयात येते.
तसेच नदीपात्रातील पाणवेली वाहून या बंधाºयापर्यंत आल्याने बंधाºयाच्या पाण्यावर सर्वत्र हिरव्यागार पाणवेलींचा थर पसरला आहे.
या पाणवेलींच्या खाली असलेले पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने डासांचा उपद्रवही वाढला आहे. बंधाºयातून वाहून जाणाºया पाण्यावर एकलहरे ते ओढा गावाच्या शिवारापर्यंत नदीत सर्वत्र बर्फाप्रमाणे दिसणारा पांढºया फेसाचा थर नदीपात्रात ठिकठिकाणी साचला आहे.
बंधाºयालगत तर पाण्याऐवजी फक्त फेसाचेच साम्राज्य आहे. मनपाने त्यांच्या हद्दीजवळील ग्रामीण भागाचा विचार करून या फेसाळलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली जात आहे. नदीपात्रातील फेसाळयुक्त पाण्याबाबत एकलहºयातील नागरिकांनी यापूर्वी आंदोलनदेखील केले आहे. मात्र दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदीपात्रातून वाहून आलेल्या पाणवेली आणि फेसाळयुक्त पाणी बंधाºयामुळे एकलहºयातच अडकले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. नदीपात्रावरील टाकळीच्या मलनिस्सारण केंद्रातून अपुºया प्रक्रियेमुळे फेसाळयुक्त पाणी बाहेर पडते. हेच पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रामदास पाटील-डुकरे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title:  Ekalatat Fasalali Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.